कोरोना विषाणूमुळे यंदाची टी-२० आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये सुरू होत आहे. भारतातील कोरोनाचा प्रभाव पाहता बीसीसीआयने ही स्पर्धा युएईमधील खेळविण्याचा निर्णय घेतला.
युएईमधील सद्य परिस्थिती लक्षात घेता राजस्थान रॉयल्स संघ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी जोरदार दावा करू शकतो. यापूर्वी राजस्थानने आयपीएल २००८ मध्ये विजेतेपद जिंकले होते.
त्यानंतर आतापर्यंत संघ अंतिम सामन्यात देखील जाऊ शकला नाही. त्याच वेळी, २०१८ मध्ये राजस्थानचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात प्ले-ऑफ पर्यंत गेला होता. परंतु राजस्थानसाठी यंदाचा हंगाम खास ठरू शकतो. कारण जाणून घेऊयात.
राजस्थान रॉयल्स संघ या ४ कारणांमुळे आयपीएल २०२० जिंकू शकतो
१. संघात आहेत पॉवर हिटर्स
आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सच्या विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघातील पॉवर हिटर्स खेळाडू. राजस्थान संघात आगामी मोसमासाठी एकापेक्षा जास्त पॉवर हिटर आहेत.
या संघात रॉबिन उथप्पा, अष्टपैलू बेन स्टोक्स, महिपाल लोमरोर, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, रायन पराग आणि जोस बटलर असे खेळाडू आहेत, जे टी-२० स्वरूपात फक्त स्फोटक फलंदाजीसाठी लोकप्रिय आहेत.
या सर्व खेळाडूंचा अनुभव संघासाठीही उपयुक्त ठरेल. लोअर ऑर्डरमध्ये देखील संघात जोफ्रा आर्चर आहे, जो वेळ आला तर एका षटकात २० ते २५ धावा करू शकतो.
अशा परिस्थितीत युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या मोसमात पॉवर हिटर्सच्या जोरावर राजस्थान रॉयल्स चांगली कामगिरी करू शकेल आणि विजेता होऊ शकतो.
२. बेन स्टोक्सचा प्रभाव
राजस्थान रॉयल्सच्या विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्स. गेल्या दीड वर्षात स्टोक्सने इंग्लंड संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.
ऍसेश मालिका, विश्वचषक २१०९ मध्ये इंग्लंडकडूनमॅच विनिंग कामगिरी करणाऱ्या स्टोक्सने अलीकडेच वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वात मोठी भूमिका बजावत मालिका २-१ ने जिंकण्यास मदत केली.
कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल अष्टपैलू खेळाडू असणारा हा खेळाडू आयपीएल २०२० मध्ये मॅच विनिंग कामगिरी करू शकतो. २९ वर्षीय या अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३४ सामने खेळले आहेत आणि १३२ च्या स्ट्राईक रेटने ६३५ धावा केल्या आहेत.
स्टोक्सचे आयपीएलमध्ये एक शतक आणि एक अर्धशतकदेखील आहे. त्याने ३१.०८ च्या सरासरीने २६ बळीही घेतले आहेत. यावेळी राजस्थानसाठी स्टोक्सचा प्रभाव खूप खास ठरू शकेल.
३. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा अनुभव
राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल १३ साठी बरेच अनुभवी खेळाडू आहेत. इतर सात संघांप्रमाणेच या संघातही आगामी मोसमासाठी एकापेक्षा एक सरस आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.
कर्णधार स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर, डेव्हिड मिलर, ओशेन थॉमस, एंड्रू टाय आणि भारतीय खेळाडूंमध्ये रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना आपापल्या देशांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा खूप अनुभव आहे आणि त्यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. या हंगामात, संघाची कमान संपूर्णपणे स्टीव्ह स्मिथकडे असेल आणि २०१८ मध्ये याच स्मिथच्या नेतृत्वात संघाने प्ले ऑफमध्ये कूच केली होती.
४. संघात आहेत चांगले तरुण खेळाडू
यावेळी संघात ज्येष्ठ खेळाडू तसेच प्रतिभावान तरूण खेळाडू आहेत ज्यांचा या संघात समावेश आहे. राजस्थान रॉयल्स संघासाठी युवा खेळाडूंच्या उपस्थितीमुळे हा हंगाम चांगला ठरू शकतो.
या संघाने लिलावा दरम्यान यशस्वी जयस्वाल, आकाश सिंग, कार्तिक त्यागी या तरूणांना संघात घेतले. तर या संघात आधीच रायन पराग सारखा मॅचविनर युवा खेळाडू आहे.
मागील हंगामात परागने चांगल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळच्या युवा खेळाडूंमध्ये ज्येष्ठ खेळाडूंच्या प्रतिनिधित्वाखाली संघासाठी सामना जिंकण्याची कामगिरी करण्याची क्षमता आहे.