अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या सामन्यावेळी सर्वांची नजर फिरकीपटू राशिद खानवर होती. त्याने हैदराबादला तीन विकेट्ससह पहिला विजय मिळवून दिला होता. पण त्याच सामन्यात संघातील दुसर्या गोलंदाजानेही शानदार कामगिरी केली होती आणि तो गोलंदाज म्हणजे तामिळनाडूचा टी नटराजन.
आयपीएल २०२० मध्ये प्रकाश झोतात आलेल्या टी नटराजन ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी राखीव गोलंदाज म्हणून निवडला गेला. पण या राखीव गोलंदाजांसाठी हा दौरा सर्वात संस्मरणीय राहिल असा होता. कारण राखीव गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या नटराजनला संघात निवडल्या गेल्या खेळाडूंना दुखापती झाल्याने सर्वप्रथम वनडे मग टी२० आणि आता कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या अशा खास गोलंदाजाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ.
तमिळनाडू प्रीमियर लीगने दिली ओळख
याच स्पर्धेदरम्यान नटराजनने आपल्या यॉर्करच्या अचूक टप्प्याने प्रभावित केले होते. २०१६ तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये दिंडीगुल ड्रॅगन्स आणि अल्बर्ट टट्टी पॅट्रियट्स यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हर दरम्यान पूर्ण षटक यॉर्कर चेंडू टाकून त्याने त्याच्या प्रतिभेचे प्रदर्शन दाखवले. त्यानंतर २०१७ च्या आयपीएलच्या लिलावा दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला ३ कोटींमध्ये विकत घेतले. त्या हंगामात, नटराजनने पंजाबकडून ६ सामने खेळले.
जेव्हा पंजाबने सोडलं आणि हैदराबादने संधी दिली
त्या खराब हंगामानंतर, त्याची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली आणि आयपीएल २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला फक्त ४० लाखांमध्ये विकत घेतले. टीएनपीएलचे माजी दिग्गज आणि हैदराबाद संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांनी नटराजनवर विश्वास दर्शविला. जरी नटराजनने २०१८ आणि २०१९ च्या हंगामात एकही सामना खेळला नाही. परंतु या दरम्यान त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपली कामगिरी सुरू ठेवली.
मंगळवारी आयपीएल २०२० मध्ये दिल्लीविरुद्ध मैदानात उतरलेल्या नटराजनला पाहून असे वाटत नव्हते की तो मागील दोन हंगामात संघाच्या अंतिम अकरामधून बाहेर होता. नटराजनने एकामागून एक यॉर्कर टाकून आपली प्रतिभा दाखविली. या हंगामात नटराजनने १६ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या. तसेच सर्वाधिक यॉर्कर चेंडू टाकले.
नटराजन आपल्या नावाची जर्सी घालून का खेळला नाही
सालेमपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चिनप्पापट्टी गावात राहणाऱ्या नटराजनचे वडील थांगरसु विणकाम करतात आणि त्याची आई रस्त्यावर मांसाची विक्री करते. पाच भावंडांपैकी ज्येष्ठ असलेल्या नटराजनला प्रशिक्षक जयप्रकाश याने क्रिकेटशी जोडले. त्याने या तरुण खेळाडूची कला ओळखली आणि नटराजन याला क्रिकेटमध्ये पुढे जाण्याचा सल्ला दिला. आपल्या गुरूचे आभार मानण्यासाठी नटराजनने दिल्लीविरुद्धच्या सामन्यादरम्यान ‘जेपी नट्टू’ नावाची जर्सी घातली.
युवा खेळाडूंना करतो मदत
स्वतः अडचणींशी झुंज देऊन आयपीएलसारख्या मोठ्या टप्प्यात पोहोचल्यानंतर नटराजनने दोन वर्षांपूर्वी आपल्या गावात आयपीएलमधून मोठ्या प्रमाणात पैशांची मदत घेऊन एक आधुनिक विद्याशाखा तयार केली. जेणेकरून युवा खेळाडूंना त्या त्रासाला सामोरे जावे लागू नये.
महत्त्वाच्या बातम्या-
-काय सांगता.! त्याने एक-दोन नाही तर तब्बल ७ चेंडू टाकले ‘यॉर्कर’
-चेन्नई सुपर किंग्ज संघातील दुसरा धोनी? जाणून घ्या कोण आहे ‘तो’ खेळाडू
-आयपीएलमध्येही बोलू मराठीतच; झहीर खान बीडच्या ‘या’ खेळाडूला देतोय मराठीत गोलंदाजीचे धडे
ट्रेंडिंग लेख-
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-कधीकाळी खेळपट्टी तयार करणारा गाजवतोय आयपीएल, वाचा त्याच्या संघर्षाची कहानी