---Advertisement---

राशिद खान आम्हाला विकत देता का? पाहा कोणत्या संघाने केली होती मागणी

On: गुरूवार, नोव्हेंबर 12, 2020 5:38 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग या जगातली सर्वात लोकप्रिय टी२० क्रिकेट लीगमध्ये जगभरातील अनेक दिग्गज आणि नावाजलेले खेळाडू सहभागी होतात. प्रत्येक फ्रॅन्चाइजी त्यांच्या संघात अशाच उत्कृष्ट खेळाडूंना स्थान देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सर्वच नावाजलेल्या खेळाडूना संघात घेण्यात यश मिळेलच असं होत नाही.

मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खरेदी केले होते. दिल्लीने ट्रेंट बोल्टला रिलीझ करण्याच्या निर्णयाबद्दल सनरायझर्स हैदराबादचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता टॉम मूडीने मुंबई इंडियन्स आणि राशिद खानबद्दल आणखी एक खुलासा केला आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये त्यांना बहुतेक सामने खेळावे लागतील, असे दिल्लीला वाटत होते. त्यामुळे त्यांनी फिरकीपटूंवर जोर दिला. मात्र दिल्लीची ही चाल प्रभावी ठरली नाही. कोव्हिड 19 या साथीच्या आजारामुळे, आयपीएलचा 13 वा हंगाम यावर्षी युएईमध्ये खेळला गेला आणि बोल्टला मुंबई संघाला देऊन दिल्लीने चुकी केली असं म्हणणे व्हावगे ठरणार नाही.

सनरायझर्स हैदराबादचे माजी मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले की “मुंबई इंडियन्सने एकदा राशिद खानला हैदराबाद संघातून खरेदी करायचे आहे असे सांगितले होते. आज राशीद सनरायझर्स हैदराबादचा सर्वात खास खेळाडू आहे.”

नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2020 मध्ये राशिद खानने 16 सामन्यांत 17.20 च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या. सातत्याने चांगली कामगिरी करण्याची रशिदची क्षमता त्याला सर्वात लोकप्रिय खेळाडू बनवते. हेच कारण होते की एकदा मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला होता.

ईएसपीएन क्रिकइन्फो वेबसाईटशी झालेल्या संभाषणात टॉम मूडी म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सला रशिद खान त्यांच्या संघात हवा होता. मुंबई हा एकमेव संघ आहे ज्याने राशिदला विकत घेण्यासाठी दार ठोठावले. अन्य फ्रँचायझींनी राशिदला खरेदी करण्यात रस दाखविला नव्हता.”

मुंबई इंडियन्स आयपीएल 2020 चा विजेता बनला आहे. अंतिम सामन्यात या संघाने दिल्लीला पाच गडी राखून सहजपणे पराभूत करून पाचवे विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 7 गडी गमावून 156 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---