---Advertisement---

Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

On: बुधवार, ऑक्टोबर 28, 2020 12:36 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला खूप महत्त्व आहे. आजपर्यंत आपण प्रत्येक क्रिकेट प्रकारात खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचा जलवा पाहिला आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलबाबत बोलायचं झालं, तर अविस्मरणीय क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते. असेच काहीसे आयपीएलच्या २०२० या हंगामातही पाहायला मिळाले आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज खेळाडू निकोलस पूरनने बाऊंड्रीच्या पलीकडे षटकारासाठी जाणारा चेंडू रोखला. त्याचे हे क्षेत्ररक्षण पाहून जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि पंजाबच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जाँटी ऱ्होड्सनेही सलाम ठोकला. सोबतच पंजाबचा मयंक अगरवालनेही सुपर ओव्हरमध्ये षटकार रोखत मुंबई इंडियन्सच्या जबड्यातून विजय खेचून आणला. आणि संघाला प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवले. चला तर मग पाहुया आयपीएलच्या या हंगामातील ५ सर्वोत्तम क्षेत्ररक्षण…

१. निकोलस पूरनचे अफलातून क्षेत्ररक्षण

आयपीएल २०२० मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झालेल्या ९ व्या सामन्यात निकोलस पूरनने सर्वांची मने जिंकली. त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने षटकार जाणाऱ्या चेंडूला २ धावांमध्ये रूपांतरित केले. राजस्थानच्या डावाच्या ८ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनने जोरदार फटका मारला. हा चेंडू लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या पूरनने हवेत उडी घेत चेंडू झेलला. परंतु तो बाऊंड्रीच्या पलीकडे जाणार तेवढ्यात त्याने चेंडू मैदानात फेकला. पूरनच्या या क्षेत्ररक्षणावर जाँटी ऱ्होड्सने उभे राहून टाळ्या वाजवल्या, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करत आतापर्यंत सर्वोत्तम चेंडू अडवल्याचे सांगितले.

२. मयंक अगरवालने मुंबईंचा विजयरथ रोखला

पंजाब आणि मुंबई इंडियन्समध्ये खेळण्यात आलेल्या ३६ व्या सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळण्यात आल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा फलंदाज कायरन पोलार्डने लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारला. हा फटका पाहून असे वाटले की, चेंडू बाऊंड्रीच्या पलीकडे जाईल. परंतु त्याचवेळी पंजाबच्या मयंक अगरवालने जमिनीपासून २-३ फूट उंच उडी घेत चेंडू मैदानात फेकला. त्याने यावेळी संघासाठी ४ धावाही वाचवल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये मुंबईने १२ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पंजाबने केवळ ४ चेंडूमध्ये पूर्ण केले.

३. रहाणेने षटकाराचे रूपांतर १ धावेत केले

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळण्यात आलेल्या ३० व्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत १६२ धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला शेवटच्या षटकात २२ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर राजस्थानच्या राहुल तेवतियाने मारलेला फटका दिल्लीच्या अजिंक्य रहाणेने शानदार क्षेत्ररक्षण करत रोखला आणि षटकाराऐवजी केवळ एक धाव दिली. त्यामुळे दिल्लीने हा सामना जिंकला होता.

https://twitter.com/watsonmpaul/status/1316433362526121990

४. आर्चरने उडी मारत एका हाताने घेतला झेल

राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल २०२०मधील ४५ व्या सामन्यात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईच्या डावाच्या ११ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर इशान किशनने जोरदार फटका मारला. हा फटका बाऊंड्रीच्या पलीकडे जाणार तेवढ्यात आर्चरने उडी मारत एका हाताने चेंडू झेलला. या झेलाने संघसहकारीही आश्चर्यचकीत झाले. सचिन तेंडुलकरने ट्वीट करत लिहिले, “झेल पाहून असे वाटले की, आर्चर घरातील बल्ब बदलत आहे.” हा सामना राजस्थानने ८ विकेट्सने जिंकला.

५. केएल राहुलने पराभूत होण्यापासून वाचवले

पंजाब आणि मुंबई संघात झालेल्या ३६ वा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यात सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली. त्यामुळे निकाल लावण्यासाठी दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने ५ धावा केल्या होत्या. यावेळी मुंबईला १ चेंडूत २ धावा हव्या होत्या. शेवटच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने २ धावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ख्रिस जॉर्डनच्या थ्रोवर कर्णधार केएल राहुलने यष्टीच्या पुढे येत चेंडू झेलला आणि डीकॉकला बाद केले.

https://twitter.com/NapsterVB/status/1317912605453774848

त्यामुळे सुपर ओव्हर खेळण्यात आली. परंतु सामना पंजाब संघाने जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

-अबब! आर्चरने इशान किशनचा घेतलेला झेल पाहून सगळ्यांच्याच बत्त्या झाल्या गुल

-जोफ्रा आर्चरने केली जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची हुबेहुब नक्कल; मजेशीर व्हिडिओ व्हायरल

-जेवलीस का गं..? इशाऱ्यांद्वारे विचारपूस; गरोदर अनुष्काची मैदानावर असतानाही विराट घेतोय काळजी

ट्रेंडिंग लेख-

-बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं

-…आणि सचिनचे शब्द‌ हार्दिकने खरे करून दाखवले !

-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---