इंडियन प्रीमियर लीगच्या 13 मोसमाआधी दिल्ली कॅपिटल्स संघाने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे ट्रेडिंग मुंबई इंडियन्स संघाशी केले आहे. त्यामुळे 2020च्या आयपीएलमध्ये बोल्ट मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.
मुंबई इंडियन्समध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश असल्याने आता त्याला बोल्टचीही साथ मिळणार आहे. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. याबद्दल मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धनेने आनंद व्यक्त केला आहे.
जयवर्धने म्हणाला, ‘आमच्यासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे जेसन बेरेनडॉर्फचे ऑपरेशन आहे. त्यामुळे त्याची जागा नवीन खेळाडूने घेण्याची गरज होती, त्याने गेल्या वर्षी आमच्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे.’
‘जेव्हा दिल्लीने बोल्टला सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला असे वाटले की तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, जो कठीण परिस्थितीत विरोधी संघासाठी अत्यंत प्राणघातक आहे. खासकरुन जेव्हा तो बुमराहबरोबर गोलंदाजी करेल.’
याबरोबर मुंबई इंडियन्सने त्यांचा फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडेचे ट्रेडिंग दिल्ली कॅपिटल्सबरोबर केले होते. त्याच्याबदल्यात दिल्लीकडून त्यांना अष्टपैलू क्रिकेटपटू शेर्फेन रुदरफोर्ड मिळाला.
याबदद्ल जयवर्धने म्हणाला, ‘अर्थातच आम्ही मयंकला जाऊ दिले कारण आम्हाला वाटले की तो दिल्लीकडून काही सामने खेळू शकेल आणि त्यामुळे आम्हाला आता एक उत्तम खेळाडू शेर्फेन रुदरफोर्डला मिळवण्याची संधी मिळाली.’
तसेच धवल कुलकर्णीही 2020 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. याबद्दल जयवर्धने म्हणाला, ‘धवल कुलकर्णी हा अनुभवी गोलंदाज आहे. तो मुंबईचा आहे. त्यामुळे त्याला संघात समाविष्ट करण्यात आम्हाला अजिबात संकोच वाटला नाही. आमच्यासाठी काही महत्त्वाचे क्षेत्र आम्ही मजबूत केले आहेत आणि आता आम्ही लिलावासाठी उत्साही आहोत.’
2020 च्या आयपीएलसाठी डिसेंबरमध्ये कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात पाच भारतीय व दोन परदेशी खेळाडू खरेदी करण्याचा मुंबईकडे पर्याय आहे. या लिलावासाठी मुंबईकडे 13.05 कोटी रुपये उपलब्ध आहेत.
मुंबई इंडियन्सने हे खेळाडू कायम ठेवले- रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंडया, ईशान किशन, सूर्य कुमार यादव, राहुल चाहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, आदित्य तारे, सुचित रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डिकॉक, किरॉन पोलार्ड, शेरीफेन रदरफोर्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेनाघन आणि ट्रेंट बोल्ट.
मुंबई इंडियन्सने या खेळाडूना मुक्त केले- एव्हिन लुईस, अॅडम मिलने, जेसन बेहरेनडॉर्फ, बुरेन हेंड्रिक्स, बेन कटिंग, युवराज सिंग, मयंक मार्कंडे, बरिंदर स्त्राण, रसीख डार, पंकज जसवाल, सिद्धेश लाड, अलजारी जोसेफ.
कमी वेळेत चांगली कामगिरी करणाऱ्या मयंक अगरवालने केला मोठा खुलासा…
वाचा- 👉https://t.co/7knfAJ5UTQ👈#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 17, 2019
कॅप्टन कोहलीने मयंक अगरवालकडे केली ही मागणी, मात्र यामुळे झाली नाही ती पूर्ण!
वाचा- https://t.co/7SePDLXnFA#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #ViratKohli #MayankAgarwal— Maha Sports (@Maha_Sports) November 17, 2019