विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये २०१८-१९ दरम्यान कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते तसेच मालिकाही जिंकली होती. तेव्हापासून त्याच्या विजयाची टक्केवारी वाढत आहे. परंतु जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलमध्ये त्याला आपल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आतापर्यंत एकदाही विजय मिळवून देता आलेला नाही.
आयपीएल २०२०चा १३ वा हंगाम यंदा भारताबाहेर म्हणजेच युएईत येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यादरम्यान आरसीबी संघाचे गोलंदाज युएईतील सावकाश खेळपट्टीचा आनंद घेताना दिसतील. आरसीबीने आपल्या ताफ्यात काही चांगल्या खेळाडूंचा समावेश केला आहे. परंतु माजी खेळाडू गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की, आरसीबी संघ आताही संतुलित नाही.
आयपीएल २०२०चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यातील पहिला सामना हा गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळण्यात येणार आहे. विराटच्या नेतृत्वातील संघ आरसीबीला आपला पहिला सामना २१ सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैद्राबाद संघासोबत दुबई येथे खेळायचा आहे.
यादरम्यान गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना म्हटले, “विराट आरसीबी संघाचे नेतृत्व २०१६ पासून करत आहे. जर संघ आधीपासूनच संतुलित नव्हता, तर विराटने अधिक लक्ष द्यायला पाहिजे होते.” गंभीरला वाटते की, आरसीबी संघाची फलंदाजी फळी आताही मजबूत आहे.
“मला आताही वाटते की, आरसीबी संघाची फलंदाजी फळी मजबूत आहे. परंतु त्यांचे गोलंदाज यामुळे खुश होतील की, त्यांनी ७ सामने चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळायचे नाहीत. तुम्ही दुबई आणि आबु धाबीमध्ये खेळत आहात. तेथील खेळपट्ट्या चिन्नास्वामी स्टेडिअमप्रमाणे सपाट नाहीत. चिन्नास्वामी स्टेडिअमचे मैदान लहान आहे आणि खेळपट्टी सपाट आहे. दुबईमध्ये तुम्ही उमेश यादव आणि नवदीप सैनी यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीची अपेक्षा करू शकता,” असेही आरसीबी संघाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला.
“ख्रिस मॉरिस फलंदाजी आणि गोलंदाजी चांगल्याप्रकारे करतो तसेच संघाला संतुलित ठेवण्याचे कामही करतो. तो अंतिम षटकांतील चांगला गोलंदाज आहे. याव्यतिरिक्त संघाकडे फिरकीपटू गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहलही आहेत. परंतु हे पाहावे लागेल की, कोणत्या चार परदेशी खेळाडूंना अंतिम अकरामध्ये सामील केले जाते.”
आयपीएल २०२० साठी आरसीबी संघ-
विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, जॉश फिलिप, मोईन अली, ऍरॉन फिंच, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, पार्थिव पटेल, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, इसुरु उदाना, डेल स्टेन, पवन नेगी, देवदत्त पडिक्कल, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत मान सिंग, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, ऍडम झम्पा.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहित शर्मा म्हणतोय, भावा! तू लवकरच भारताकडून खेळणार क्रिकेट
-एक असा क्रिकेटर, जो आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही राहू शकला नाही उपस्थित
-कोच आणि खेळाडू म्हणून आयपीएल जिंकणारा ‘तो’ एकमेव खेळाडू
ट्रेंडिंग लेख-
-‘त्या’ भावासाठी धावून आली बहीण! आता आयपीएल गाजवून देणार भाऊबीजेची खास भेट
-युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश
-एमएस धोनीच्या सीएसके संघातील ३ फ्लॉप खेळाडू, ज्यांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतं मोठ नाव