fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोच आणि खेळाडू म्हणून आयपीएल जिंकणारा ‘तो’ एकमेव खेळाडू

September 15, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0

ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन हे क्रिकेट वर्तुळातील मोठं नाव समजलं जात. लेहमनच नाव घेतलं तर कधी आयपीएल खेळला हे आठवणंही कठीण जाईल. परंतू गमतीचा भाग असा की आयपीएलमध्ये एक खेळाडू व एक कोच म्हणून विजेतेपद मिळणारा तो एकमेव व्यक्ती आहे.

२००५मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या लेहमनने आयपीएलमध्ये केवळ २ सामने खेळले. वयाच्या ३८व्या वर्षी अर्थात २००८मध्ये तो आयपीएलच्या पहिल्याच हंगामात हे दोन सामने खेळला होता. तेव्हा राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या ग्रॅमी स्मिथला दुखापत झाल्यामुळे तो पहिले तीन सामने खेळणार  नव्हता. त्याजागी लेहमनला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. परंतू या दोन सामन्यात १ व १७ अशा धावा करु शकला. त्यानंतर स्मिथ परतल्यावर त्याला उर्वरित स्पर्धेत राजस्थानकडून संधी मिळाली नाही. परंतू याच हंगामात राजस्थानने आयपीएलचे पहिले विजेते होण्याचा मान मिळवला. लेहमन जरी अंतिम सामन्यात संघाचा भाग नसला तरी तो स्कॉडचा भाग होता.

त्यानंतर २००९मध्ये याच लेहमनने डेक्कन चार्जर संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली. त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू व २००८मध्ये डेक्कनचं प्रशिक्षकपद सांभाळलेल्या रॉबीन सिंगची जागा घेतली होती. २००८ हंगामात डेक्कन संघाची अवस्था चांगली नसल्यामुळे लेहमनला ही जबाबदारी मिळाली. लेहमनच्याच प्रशिक्षणाखाली २००९ हंगामात डेक्कन संघाने आपले पहिले व एकमेव विजेतेपद मिळवले. २०१३मध्ये डेक्कन संघावर बंदी आल्यानंतर लेहमनने किंग्ज ११ पंजाबच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. परंतू संघ थेट ६व्या स्थानावर फेकला गेला.

लेहमन जगातील त्या मोजक्या खेळाडूंमध्ये येतो, ज्यांना सलग दोन वेळा विश्वविजेत्या संघाचा भाग होण्याचे भाग्य लाभले आहे. लेहमन १९९९ व २००३ या दोन विश्वचषकात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. पुढे तो याच ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला परंतू चेंडू छेडछाड प्रकरणानंतर त्याने संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते.


Previous Post

‘त्या’ भावासाठी धावून आली बहीण! आता आयपीएल गाजवून देणार भाऊबीजेची खास भेट

Next Post

रोहित शर्मा म्हणतोय, भावा! तू लवकरच भारताकडून खेळणार क्रिकेट

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

KKR vs CSK : आंद्रे रसल, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकानंतरही कोलकाताचा चेन्नईकडून १८ धावांनी पराभव

April 21, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

मोईन अलीची विकेट सुनील नारायणसाठी ठरली विक्रमी; हरभजनला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम

April 21, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

अभिनंदन फाफ! डू प्लेसिसने टी२० कारकिर्दीत केला ‘हा’ मैलाचा दगड पार

April 21, 2021
Next Post

रोहित शर्मा म्हणतोय, भावा! तू लवकरच भारताकडून खेळणार क्रिकेट

एक असा क्रिकेटर, जो आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही राहू शकला नाही उपस्थित

असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म संघाला देणार आयपीएल विजेतेपद

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.