नवी दिल्ली | इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्लीने आयपीएल इतिहासातील 5 वा किताब जिंकला. मुंबई हा एकमेव संघ आहे ज्याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक 5 किताब जिंकले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून या संघांचे कौतुक होत आहे. यातच भारताचा दिग्गज फलंदाज वसीम जाफर याने मुंबई संघाबद्दल एक मजेदार ट्विट केले आहे.
मर्यादित षटकांच्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 5 वा आणि सलग दुसरा किताब जिंकला.
मुंबईने मिळवलेल्या विक्रमी विजयासाठी या संघाचे चारही बाजूंनी अभिनंदन होत आहे. दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर याने एक मजेदार टिप्पणी केली आहे.
जाफर याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले. ज्यामध्ये तो म्हणाला की, “अभिनंदन मुंबई इंडियन्स.आता काही वर्षे रजा घ्या. तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवलं आहे.”
Congratulations @mipaltan! Now go take a couple of years off, you've earned it. 😉 #IPL2020 #IPLfinal #MIvsDC #RohitSharma pic.twitter.com/rZYnpoRk9A
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 10, 2020
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे, तर रोहित आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. दिल्लीने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्या संघाला पराभव करत मुंबईने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिडा विश्वावर शोककळा! २० शतकांच्या मदतीने १४ हजार धावा कुटणाऱ्या दिग्गजाचे निधन
हम तैयार है..! बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचे खास फोटो प्रसिद्ध
….म्हणून इयत्ता नववीच्या वर्गातच रोहित बनला होता शालेय संघाचा कर्णधार