---Advertisement---

महिला आयपीएलचे सामने होणार युएईमधील ‘या’ शहरात?

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2020 2:15 PM
---Advertisement---

महिला टी-२० चॅलेंज (Women’s T20 Challenge) स्पर्धा अर्थात महिला आयपीएल पुढील महिन्यात आयपीएल २०२० दरम्यान खेळविले जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेणार्‍या ३० हून अधिक भारतीय महिला क्रिकेटर्स १३ ऑक्टोबरला मुंबई येथे जमतील. या सर्व महिला खेळाडू मुंबईत ९ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. महिला टी-२० चॅलेंज जाहीर होण्यापूर्वी ही माहिती सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आली होती. महिला टी-२० चॅलेंज तीन संघामध्ये असेल. स्पर्धेपूर्वी परदेशी खेळाडूंनाही क्वारंटाइन ठेवण्यात येईल.

एक माहितीनुसार महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होऊ शकतात. या स्टेडियममध्ये या सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलचे १२ सामनेही आयोजित करण्यात आले आहेत. या मैदानावर पहिल्या ४ सामन्यात मोठी धावसंख्या झाली आहे. गेल्या महिन्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि वरिष्ठ अधिकाराऱ्यांनीही मैदानाची माहिती घेतली होती.

भारतीय क्रिकेट बोर्डाने अद्याप या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिला नाही, परंतु माध्यमांतील वृत्तांनुसार महिला टी-२० चॅलेंजचे सर्व सामने शारजाहमध्ये खेळता येतील. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय महिला खेळाडू वेगवेगळ्या राज्यातून मुंबईत दाखल होतील आणि तिथे क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर २१ ऑक्टोबरला दुबईला पोहोचतील. तिथेही त्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल.

महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा ४ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना ९ नोव्हेंबरला खेळविण्यात येईल. हे सर्व सामने आयपीएलच्या प्लेऑफ सामान्यांनदरम्यान खेळले जातील. आयपीएलच्या सर्व ८ संघांप्रमाणेच या तिन्ही संघांनाही बायोबबलमध्ये ठेवले जाईल आणि कठोर नियमांनुसार हॉटेलमधून स्टेडियममध्ये ने-आण करण्यात येईल. मागील वर्षी हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हास संघाने हे विजेतेपद जिंकले होते. अंतिम सामन्यात त्यांनी मिताली राजच्या वेलोसिटी संघाला पराभूत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2020 : आज पंजाब-कोलकाता आणि चेन्नई-बेंगलोर येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही

IPL 2020: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ‘युनिवर्सल बॉस’ ख्रिस गेलचे होणार कमबॅक?

बीसीसीआयसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोडली परंपरा; माजी खेळाडूला आला राग, म्हणे “मला ही गोष्ट पटलीच नाहीये”

ट्रेंडिंग लेख –

टी-२० विश्वचषक २०१२ : क्रिकेट जगतातील रावडी संघाला गतवैभव मिळवून देणारी स्पर्धा

शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…

किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---