---Advertisement---

आयपीएल २०२१: पहिल्या तीन सामन्यांत ‘हे’ ३ खेळाडू ठरले हुकूमी एक्के, ज्यांनी बदलला सामन्याचा रंग

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 6:59 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ हंगामाला ९ एप्रिल रोजी सुरुवात झाली. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. पहिल्या सामन्यात बेंगलोर संघाने २ गडी राखून मुंबई संघावर विजय मिळवला. रविवार ११ एप्रिल २०२१ पर्यंत आयपीएल २०२१ हंगामाचे पहिले ३ सामने झाले असून त्यात तीन विविध खेळाडूंनी महत्वाची कामगिरी बजावली. तर चला त्या ३ खेळाडूंबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात

३. हर्षल पटेल
हर्षल पटेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा खेळाडू असून मुंबई इंडियन्स संघाच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने बेंगलोरच्या विजयात मोलाचे योगदान दिले. हर्षल पटेलने त्याच्या गोलंदाजीने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अखेच्या षटकांमध्ये संघर्ष करायला लावला. ज्या वेळी मुंबई संघाची १२.५ षटकात १०५/३ अशी चांगली परिस्थिती होती, तेव्हाच बेंगलोरच्या या गोलंदाजांने चांगली कामगिरी करून मुंबईला मोठी धावसंख्या करण्यापासून थांबवले.

हर्षल पटेलने इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, किरॉन पोलार्ड आणि मार्को जेन्सन यांना बाद करण्याचा कारनामा केला. त्याने ४ षटकात २७ धावा देऊन ५ बळी मिळवले. या सामन्यात मुंबईने बेंगलोरला १६० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बेंगलोरने अखेरच्या चेंडूवर पूर्ण करत सामना जिंकला.

२. शिखर धवन
सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून बरेच वर्ष खेळल्यानंतर शिखर धवन आता दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसत आहे. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधात जिंकलेल्या सामन्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ दोघे दिल्ली संघाच्या विजयाचे हिरो ठरले.

शिखर धवनने यावेळी ५४ चेंडूंचा सामना करताना ८५ धावा केल्या. तसेच पृथ्वी(७२) सोबत पहिल्या विकेटसाठी त्याने १३८ धावांची भागीदारी केली. चेन्नई संघाने दिल्लीसमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते दिल्लीच्या संघाने १९ व्या षटकातच गाठले. यावेळी शिखर धवनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

१. नितीश राणा
रविवार, दिनांक ११ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना झाला. त्यात कोलकता नाईट रायडर्सने १० धावांनी बाजी मारली. यावेळी नितीश राणाने अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. त्याने ५६ बॉलचा सामना करताना ८० धावा केल्या. यात त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे कोलकाता संघाने हैद्राबाद संघापुढे १८८ धावांचे लक्ष्य दिले होते. त्या धावांचा पाठलाग करताना हैद्राबाद संघ २० षटकांत १७७ धावाच करू शकला. राणाला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोनातून बरा झालेला ‘हा’ क्रिकेटपटू बेंगलोरकडून धावांचा पाऊस पाडण्यास सज्ज, म्हणतोय, ‘कोरोना होणे माझ्यासाठी…’

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळणार

वाथी फिवर! धवनने अश्विनला नाचण्यासाठी घातली गळ, शॉ-उमेशने घेतली मजा, पाहा भन्नाट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---