आयपीएल २०२० चा हंगाम संपून २ महिनेच उलटत नाहीत, की सर्वांना आयपीएलच्या १४ व्या हंगामाची उत्सुकता लागली आहे. बुधवारी(२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपल्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघाच्या पर्समध्ये शिल्लक रक्कमेत वाढ झाली आहे.
फ्रँचायझींना त्यांच्या संघातील सर्व २५ खेळाडू ८५ कोटींच्या आतच बसवायचे आहेत. त्यामुळे यंदा बऱ्याच मोठ्या खेळाडूंना फ्रँचायझींनी यंदा मुक्त केले आहे आणि आपल्या पर्समधील शिल्लक रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएल लिलाव रंजक होईल. हा लिलाव फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.
यावेळी सर्वाधिक रक्कम किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडे आहे. त्यांच्याकडे शिल्लक रक्कम ५३.२ कोटी आहे. त्यांच्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडे ३५.७० कोटी रुपये शिल्लक आहे. त्यांनी यंदा तब्बल १० खेळाडू संघातून मुक्त केले आहेत. तसेच यंदाच्या लिलावासाठी सर्वाधिक कमी रक्कम सनरायझर्स हैदराबादकडे आहे. कारण त्यांनी कोणत्याही मोठ्या खेळाडूला संघातून बाहेर केलेले नाही. त्यांच्याकडे १०.७५ कोटी रुपये शिल्लक आहेत.
संघातून मुक्त केलेले खेळाडू आणि शिल्लक रक्कम –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
मुक्त केलेले खेळाडू – मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना, उमेश यादव, पार्थिव पटेल आणि डेल स्टेन
संघात रिकामी जागा – १३ खेळाडू (४ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – ३५.७ कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स –
मुक्त केलेले खेळाडू – स्टिव्ह स्मिथ, ओशान थॉमस, आकाश सिंग, वरुण ऍरॉन, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग, अंकित राजपूत
संघात रिकामी जागा – ८ खेळाडू (३ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – ३४.८५ कोटी रुपये
मुंबई इंडियन्स –
मुक्त केलेले खेळाडू – लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेनाघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेर्फेन रदरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख
संघात रिकामी जागा – ७ खेळाडू (४ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – १५.३५ कोटी रुपये
चेन्नई सुपर किंग्स –
मुक्त केलेले खेळाडू – मुरली विजय, हरभजन सिंग, पियुष चावला, केदार जाधव, शेन वॉटसन आणि मोनू सिंग
संघात रिकामी जागा – ७ खेळाडू (१ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – २२.९ कोटी रुपये
किंग्स इलेव्हन पंजाब –
मुक्त केलेले खेळाडू – ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉइन, जगदीशा सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गॉथम, तजिंदर सिंह
संघात रिकामी जागा – ९ खेळाडू (५ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – ५३.२ कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद –
मुक्त केलेले खेळाडू – संजय यादव, बी संदीप, बिली स्टॅनलेक, फॅबियन ऍलन, यारा पृथ्वीराज
संघात रिकामी जागा – ३ खेळाडू (१ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – १०.७५ कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स –
मुक्त केलेले खेळाडू – ऍलेक्स कॅरे, किमो पॉल, संदिप लामिछाने, तुषार देशपांडे, मोहित शर्मा आणि जेसन रॉय
संघात रिकामी जागा – ६ खेळाडू (२ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – १२.८ कोटी रुपये
कोलकाता नाईट रायडर्स –
मुक्त केलेले खेळाडू – एम सिद्धार्थ, निखिल नाईक, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रिन, टॉम बंटन यांचा समावेश आहे.
संघात रिकामी जागा – ७ खेळाडू (१ परदेशी)
संघाकडे असलेली शिल्लक रक्कम – १०.८५ कोटी रुपये
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल प्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी होऊ शकतो आयपीएल २०२१ चा लिलाव
मोठी बातमी! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूची फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती






