आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होत आहेत. हे सामने यूएईत आयोजित करण्यात आले आहेत. भारतातील कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव आणि स्पर्धेदरम्यान काही संघातील खेळाडूंना झालेले कोरोनाचे संक्रमण या पार्श्वभूमीवर आयपीएलचा २०२१ चा हंगाम मे महिन्याच्या सुरुवातीला स्थगित करण्यात आला होता. आता हा हंगाम पुन्हा युएईमध्ये सुरू होत आहे.
त्यामुळे आयपीएलचे संघ यूएईत दाखल होऊ लागले आहेत. मुंबई इंडियन्सचा संघही यूएईत दाखल झाला आहे. संघाने त्यांच्या सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून त्याच्या सरावाची माहिती दिली आहे.
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यावर्षी मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. संघाने त्याला २०२१ च्या लिलावात २० लाखाच्या मुळ किंमतीमध्ये विकत घेतले. पण, त्याला पहिल्या टप्प्यातील सामन्यांत संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मात्र, तो यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये संधी मिळवण्यासाठी जोरदार सराव करत असल्याचे दिसते.
तो या स्पर्धेसाठी उत्सुक झाला आहे. याआधी अर्जुनने यावर्षी सैयद मश्ताक अली टी २० स्पर्धेत मुंबईसाठी दोन सामने खेळले आहेत.
काही दिवसापूर्वी मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक झहीर खान त्याला गोलंदाजीच्या काही टिप्स देताना दिसला होता. त्याच्यानंतर संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी त्याला गोलंदाजीमधल्या काही महत्वाच्या टिप्स देताना दिसला आहे. अर्जुनने धवल कुलकर्णीसोबत गोलंदाजीच्या टिप्स घेतानाचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. त्याने त्याच्या स्टोरीत धवल कुलकर्णी आणि मुंबई इंडियन्स या दोघांना टॅग केले आहे.

त्यानंतर धवल कुलकर्णीनेही अर्जुनची स्टोरी त्यच्या खात्यावरून शेअर केली आहे. यूएईला रवाना होण्याच्या आधी मुंबई इंडियन्सने मुंबईमध्ये खेळाडूंसाठी कॅम्प आयोजित केला होता. अर्जुनही त्या कॅम्पचा भाग होता. सध्ये मुंबईचा संघ अबूधाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर सराव करत आहे.
https://www.instagram.com/p/CNwn8tMLuEP/
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधीक ५ वेळा विजेतेपद मिळवले आहे. या हंगामात मुंबईच्या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत आणि त्यातील ४ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत हा संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ बाबतीत संगकारा आहे धोनीपेक्षा सरस, आजच्या दिवशी केलेला क्रिकेटला अलविदा
उर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी! धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स
“फक्त ३ डावांनंतर महान फलंदाजावर शंका घेणे चुकीचे”, विराट कोहलीला माजी भारतीय क्रिकेटरचा पाठिंबा





