आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. यूएईमध्ये आयोजित केलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात बीसीसीआयने प्रेक्षकांना कोरोनाच्या काही अटींसह स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी परवानगी दिली आहे. अशातच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी एक मोठी माहिती समोर येत आहे. यूएईमधील शारजाह स्टेडियममध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या सामन्यांमध्ये १६ वर्षांखालील क्रिकेटच्या चाहत्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
१६ वर्षांखालील क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश नाही
शारजाहमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश मिळाला असला, तरीही १६ वर्षांखालील चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेता येणार नाही. तसेच स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी ४८ तासांपूर्वीचे आराटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आलेला अहवाल असणे गरजेचे आहे. या सगळ्या अटींमध्ये बसल्यावरच चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेशासाठी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अवश्यक
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेणे अवश्यक आहे आणि स्टेडियममध्ये जाताना त्याचा पुरावा प्रेक्षकांच्या सोबत असणे गरजेचे आहे. दोन्ही डोस घेतलेले असतील तरच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याव्यतिरिक्त स्टेडियमच्या आत प्रवेश मिळाल्यानंतरही प्रेक्षकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. स्टेडियममध्ये गेल्यावर तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे गरजेचे असणार आहे. दुबई स्टेडियममध्ये १२ वर्षांखालील लहान मुलांना कोरोनाची लस घेतल्याच्या पुराव्याची आवश्यकता नसणार आहे.
अबू धाबीमध्येही लसीकरण झालेले असणे अवश्यक
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमप्रमाणेच अबू धाबी स्टेडियममध्येही प्रेक्षकांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचा पुरावा प्रेक्षकांना दाखवावा लागणार आहे. तसेच प्रेक्षकांकडे ४८ तासांपूर्वीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणेही गरजेचे आहे. या स्टेडियममध्ये १२-१५ वर्षांमधील प्रेक्षकांसाठी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसले तरी चालू शकते. पण स्टेडियममध्ये मास्कचा वापर अनिवार्य आसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी क्रिकेटरचा सल्ला ऐकून थालाचे चाहते नक्कीच संतापतील! म्हणाले, ‘धोनीच्या आधी…’
यंदाची आयपीएल ट्रॉफी ‘या’ संघाचीच; मुंबई-चेन्नईतील महामुकाबल्याआधी ‘विरू बाबां’ची भविष्यवाणी