आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. दक्षिण अफ्रिकेचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज फाफ डु प्लेलिस याला सीपीएल सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. आगामी आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. यापूर्वी डू प्लेसिसला झालेली दुखापत चेन्नईसाठी चिंता वाढवणारी आहे.
आयपीएल २०२१ हंगामाच्या पहिल्या टप्प्यात काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित केली गेली होती. त्यानंतर आता युएईमध्ये या हंगामाचा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे.
डू प्लेसिसने सीपीएलमध्ये एका शतकासाह संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली
डू प्लेसिसला दुखापत होणे हा सेंट लूसिया किंग्ज प्रमाणेच चेन्नई सुपर किंग्जसाठीही मोठा झटका आहे. सेंट लूसिया किंग्जला सीपीएलचा उपांत्य सामना गाठण्सासाठी बार्बाडोस विरुद्धाचा सामना जिंकणे गरजेचे असताना संघाचा कर्णधार डू प्लेसिस चांगल्या फार्मध्ये असताना त्याला दुखापत झाली.
त्याने सीपीएलच्या चालू हंगामात ४ सप्टेंबरला सेंट किट्स अँड नेविस पेट्रियाट्स विरुद्ध ६० चेंडूत १२० धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्या गैरहजरीत संघाचे मोठे नुकसान होऊ शकते. डू प्लेसिसने मागच्याच सामन्यात बार्बाडोस राॅयल्सविरुद्ध ५४ चेंडूत ८४ धावांची महत्वाची खेळी केली होती. हा सामना सेंट लूसिया किंग्जने जिंकणे महत्वाचे होता आणि संघाने सामना जिंकला होता.
डू प्लेसिस आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात चांगल्या फॉर्ममध्ये होता
डू प्लेसिस यावर्षी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातही चांगल्या फार्ममध्ये दिसला होता. पहिल्या टप्प्यात त्याने सात सामने खेळले असून यामध्ये त्याने ३२० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने केलेली ९५ धावांची नाबाद खेळीही सामील आहे. त्याने आजपर्यांत आयपीएल कारकिर्दीत ९१ सामने खेेळले असून ३४.९६ च्या सरासरीने २६२२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात कोहली ‘या’ बाबतीत अव्वल स्थानी; ख्रिस गेलसारख्या फलंदाजालाही टाकले मागे
हेडन बनला पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक तर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लागली ‘या’ दिग्गजाची वर्णी
भारीच! आयसीसीने ‘त्या’ कुत्र्याला दिला खास ‘डॉग ऑफ द मंथ’ पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण