---Advertisement---

आयपीएल २०२१: चेन्नईला पुन्हा मोठा धक्का; गोलंदाजी प्रशिक्षकानंतर आता ‘हा’ प्रमुख सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

On: मंगळवार, मे 4, 2021 10:52 PM
---Advertisement---

भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या लाटेचा फटका इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही जोरदार बसला. हा हंगाम सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने अखेर हा हंगाम बीसीसीआयने तात्काळ अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. त्यातच सध्या आयपीएलमधील संघांच्या काही सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. यात आता चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीचाही समावेश झाला आहे.

मंगळवारी (४ मे) मायकल हसीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणेज एक दिवसापूर्वीच म्हणजेच सोमवारी चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि चेन्नईचा बस साफ करणारा कर्मचारी हे पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे चन्नईचा संपूर्ण संघ ६ दिवसांसाठी आयसोलेट झाला होता. चेन्नईचा संघ गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये आहे.

आयपीएलच्या एका सूत्राने पीटीआयला माहिती दिली आहे की ‘हसीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही पुन्हा सँपल तपासणीसाठी पाठवला होता. मात्र पुन्हा एकदा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.’

गेल्या काही दिवसात आयपीएलमधील केवळ चेन्नई सुपर किंग्सलाच नाही तर अन्य संघांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. हसीपूर्वी मंगळवारी (४ मे) सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

तसेच त्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने संदिप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमचे ५ कर्मचारी यांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे संघांच्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने अखेर आयपीएलचा हा हंगाम मंगळवारी अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी ३ मेचा सामनाआधीच रद्द करण्यात आला होता. त्यामुळे २ मेनंतर आयपीएलच्या या हंगामातील सामने झालेले नाहीत. त्यामुळे आता पुढे बीसीसीआय आयपीएलच्या या हंगामाबद्दल काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूंनी धरली मायदेशाची वाट

आयपीएलला देखील कोरोनाचा तडाखा; आजी-माजी क्रिकेटपटूंकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियन समालोचक मायकल स्लेटरच्या घाणाघाती ट्विटवर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---