---Advertisement---

आयपीएल रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूंनी धरली मायदेशाची वाट

On: मंगळवार, मे 4, 2021 10:25 PM
---Advertisement---

आयपीएलचा यंदाचा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अखेर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. बीसीसीआयने आज दुपारी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता परदेशी खेळाडूंनी एकेक करून मायदेशाची वाट पकडली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळणारे दोन खेळाडू, सॅम बिलिंग्ज आणि ख्रिस वोक्स यांनी इंग्लंडला परत जाण्यासाठी उड्डाण केल्याचे वृत्त आहे.

इंग्लंडचे खेळाडू परतीच्या प्रवासाला
खरंतर आज सकाळी आलेल्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर संपूर्ण दिल्लीच्या संघाला विलगीकरणात जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच दोन इंग्लंडच्या खेळाडूंनी मायदेशी उड्डाण केले होते. यात सॅम बिलिंग्ज आणि ख्रिस वोक्स यांचा समावेश होता. इंग्लंड सरकारने परवानगी दिल्याने त्यांना मायदेशी जाणे शक्य झाले आहे. मात्र इंग्लंडला गेल्यावर १० दिवस विलगीकरणात राहणे, त्यांना बंधनकारक असेल.

या दोन खेळाडूंशिवाय इंग्लंडचे इतरही खेळाडू या आयपीएल मध्ये सहभागी होते. त्यात ईओन मॉर्गन, मोइन अली, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, जॉनी बेअरिस्टो, ख्रिस जॉर्डन, जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांचा समावेश होता. हे सगळे खेळाडू देखील येत्या चार दिवसात इंग्लंडला परतणार आहेत. अर्थात तत्पूर्वी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक येणे, बंधनकारक असेल.

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला झाली होती कोरोनाची लागण
गेल्या दोन दिवसांपासून आयपीएल मध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. काल सर्वप्रथम कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर कालचा कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना स्थगित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर काल चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर आज सकाळी सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सगळ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज दुपारी आयपीएल तातडीने स्थगित करत असल्याचा निर्णय जाहीर केला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलला देखील कोरोनाचा तडाखा; आजी-माजी क्रिकेटपटूंकडून आल्या अशा प्रतिक्रिया

आयपीएल रद्द केल्याची बीसीसीआयला चुकवावी लागणार जबर किंमत

ऑस्ट्रेलियन समालोचक मायकल स्लेटरच्या घाणाघाती ट्विटवर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---