इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व सहभागी फ्रँचायझींचे खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. कोरोनाच्या सावटाखाली सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल बंद दाराआड खेळवली जाणार आहे. तत्पुर्वी आयपीएलवर कोरोनाचे सावट पसरलेले दिसत आहे. नुकताच दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाज अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने काही दिवसांपुर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२० मध्येही आपल्या दिल्ली संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. हंगामातील एकूण १५ सामने खेळताना त्याने ९ विकेट्स घेतल्या होत्या. तर ११७ धावाही चोपल्या होत्या.
त्यामुळे अक्षर कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने दिल्ली संघाची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गामुळे तो कदाचित पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अक्षरपुर्वी कर्णधार श्रेयस अय्यरच्या रुपात दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. त्याच्याजागी रिषभ पंतकडे नेतृत्त्वपद सोपवण्यात आले आहे.
IPL 2021: Big blow for DC as Axar Patel tests positive for COVID-19
Read @ANI Story | https://t.co/SLg4MTcZBt pic.twitter.com/Y1y8U426W3
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2021
अक्षरच्या चांगल्या फॉर्मचा दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२१ मद्ये फायदा होणार आहे. गतवर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारुनही दिल्लीचे आयपीएल चषक उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. मुंबई इंडियन्सने त्यांच्या हातून विजेतेपद हिरावून घेतले होते. मात्र यावर्षी दिल्ली संघ दुप्पट उत्साह आणि तयारीसह आयपीएलच्या रणसंग्रमात उतरेल. यावर्षी आयपीएलमधील दिल्लीचा पहिला सामना १० एप्रिल रोजी मुंबई येथे तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे.
असे आहे आयपीएल २०२० मधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक-
१० एप्रिल – मुंबई, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१५ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल – मुंबई, दिली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२० एप्रिल – चेन्नई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदारबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२७ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२ मे- अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
११ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
दिल्ली कॅपिटल्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स, एन्रिच नॉर्किए, ख्रिस वोक्स, प्रविण दुबे, टॉम करन, स्टिवन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमन हुसेन मेरिवाला, एम सिद्धार्थ
महत्त्वाच्या बातम्या-
हाव क्यूट! आयपीएलपुर्वी कॅप्टन रोहितचा रोमँटिंक अंदाज, पत्नीसोबत काढला ‘सुपरक्यूट फोटो’
बाबा नको ना जाऊ! आयपीएल वारीला निघताना वॉर्नरची लेक गळ्याला पडून ढसाढसा रडली; पाहा तो क्यूट क्षण
भारताला विश्वचषक सेमी फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या नेहराला फायनलमध्ये का दिली नाही संधी? वाचा कारण