क्रिकेट म्हटलं की, त्यात खेळाडूंकडून चुका होणारंच. कितीही अनुभवी खेळाडू असला, तरीही त्याच्याकडून चुका होतच असतात. यातील काही चुका अशा असतात, ज्यामुळे समोरच्या खेळाडूला जीवदान मिळते. तसेच तो खेळाडू पुढे संघाच्या चिंतेत वाढ करण्यासाठी कारणीभूत ठरतो. असेच काहीसे शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ मधील अंतिम सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमने- सामने होते. यावेळी एमएस धोनीकडून मोठी चूक झाली, जी पुढे संघाला महागात पडली.
नाणेफेक जिंकून केकेआर संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गनने गोलंदाजीचा निर्णय घेत सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत १९२ धावा करत केकेआरला १९३ धावांचे आव्हान दिले होते. (IPL 2021 Final Match Between CSKvsKKR MS Dhoni Dropped Venkatesh Iyer Catch See Video)
https://twitter.com/SRKxABD_/status/1449045376053362688?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1449045376053362688%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2021-final-csk-vs-kkr-ms-dhoni-dropped-venkatesh-iye-catch-watch-video-85924
या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर सलामीला फलंदाजीसाठी आले होते. यावेळी सामन्यातील दुसरे षटक सीएसकेचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हे टाकत होता. हेजलवूडच्या तिसऱ्या चेंडूवर वेंकटेशने जोरात फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडून चूक झाली आणि चेंडू बॅटची कड घेऊन मागे उभा असलेल्या एमएस धोनीकडे गेला. धोनीकडे चेंडू झेलण्याची चांगली संधी होती. मात्र, धोनीने सोपा झेलही सोडला. यानंतर संघसहकारी रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनी डोक्याला हात लावला होता. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
How in a world #MSDhoni dropped that catch!
Rare scene!
Come on #CSK 👏👏👏👏👏#KKRvCSK #KKRvsCSK #CSKvKKR #CSKvsKKR #IPLFinal #IPL2021 pic.twitter.com/fOEOzDpEsA— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) October 15, 2021
धोनीकडून इतका सोपा झेल सुटल्याचे खूप कमी वेळा पाहायला मिळाले आहे. धोनीने जेव्हा अय्यरचा झेल सोडला, तेव्हा तो शून्य धावसंख्येवर खेळत होता. मात्र, जीवदान मिळताच त्याने सीएसकेवर आपल्या बॅटमधून धावांची तोफ डागली. त्याने या सामन्यात ३२ चेंडूत ५० धावा केल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ५ चौकारही ठोकले होते.
मात्र, केकेआरच्या इतर कोणत्याही फलंदाजाला २० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. अशाप्रकारे केकेआर संघाचा डाव निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १६५ धावांवर संपुष्टात आला.
या विजयानंतर सीएसकेने चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.
संबंधित बातम्या-
-‘माही’ची खिलाडूवृत्ती! पराभवानं निराश झालेल्या मॉर्गनला धोनीनं दिलं प्रोत्साहन, पाहा व्हिडिओ