इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ग्लेन मॅक्सवेलला १४.२५ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. मॅक्सवेलने या हंगामातील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी पाहून इंग्लंड संघाचा माजी कर्णधार आश्चर्यचकित झाला आहे.
ग्लेन मॅक्सवेलने या हंगामात २ तुफानी अर्धशतक झळकावले आहेत. तसेच तो मध्यक्रमात एबी डिविलियर्ससोबत मिळून महत्वाची भूमिका बजावत आहे. अशातच इंग्लिश संघाचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने म्हटले आहे की, “आरसीबीने जितके पैसे देऊन ग्लेन मॅक्सवेलला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यावर मला शंका येत होती. मॅक्सवेल ज्या कुठल्या संघात असतो, त्या संघात त्याला महत्वाच्या खेळाडूची भूमिका पार पाडायची असते. परंतु या संघात विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांसारखे खेळाडू असताना असे होणे अशक्य आहे. असे सर्व असताना देखील ग्लेन मॅक्सवेलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने मला आश्चर्यचकित करून सोडले आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “सुरुवातीला ग्लेन मॅक्सवेलने सहजतेने खेळायला हवं. जेव्हा त्याला असे वाटेल की तो सेट झाला आहे; तेव्हा तो आपल्या टायरला आणखी पंप करेल आणि याचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला होऊ शकतो.”
ग्लेन मॅक्सवेलने या हंगामात ४ सामन्यात फलंदाजी केली आहे. यात त्याने १७६ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने २ सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. तसेच ७६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने या हंगामात १७ चौकार आणि ८ षटकार लगावले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ग्लेन मॅक्सवेलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आईच्या हातचा घास, बहिणीची प्रेमळ मिठी अन् बाबांची शिकवण; कुटुंबीयांच्या आठवणीत सुंदर झाला भावुक
पोलार्डचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; म्हणाला,”मी उत्तर देत नाही याचा अर्थ…”
“आरसीबीत एक नव्हे दोन ३६० डिग्री फलंदाज, मग गोलंदाज…,” माजी भारतीय कर्णधाराचे मोठे वक्तव्य