---Advertisement---

चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी! जडेजा शस्त्रक्रियेनंतर मैदान गाजवण्यास सज्ज

---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामासाठी १५ दिवसांचाच कालावधी राहिला आहे. येत्या ९ एप्रिलपासून या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्याचवेळी आता हा हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा पुर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्यानेच एक व्हिडिओ शेअर करत याबाबत पुरावा दिला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झाली होती दुखापत

जडेजाला २०२०-२१ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. त्याचा हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. त्याचकारणामुळे जडेजाला इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या सर्व सामन्यांना मुकावे लागले.

तो सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे सराव करत आहे. त्याने इथे रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम करताना त्याची तंदुरुस्ती मिळवली आहे. तो त्याच्या तंदुरुस्तीबद्दलचे अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तो लांब उडी मारताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओला त्याने कॅप्शन दिले आहे की ‘सतत पुढे जात राहावे.’

यापूर्वीही जडेजाने फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तोच व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने देखील शेअर करत ‘जडेजा लवकर ये’, असे म्हटले होते.

चेन्नई संघात लवकरच परतू शकतो जडेजा

जडेजा सध्या जरी बंगळुरुमध्ये असला तरी तो लवकर चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो. नुकताच चेन्नई संघ मुंबईला रवाना झाला आहे. चेन्नईचे १४ व्या आयपीएल हंगामातील पहिले ५ सामने मुंबई येथे होणार आहे. जडेजा मागील काही हंगामापासून चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.

जडेजाची कारकिर्द

जडेजाने ५१ कसोटी सामने खेळले असून यात १९५४ धावा केल्या आणि २२० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १६८ वनडे सामन्यात त्याने २४११ धावा केल्या आहेत आणि १८८ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने २१७ धावा केल्या असून ३९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये १८४ सामने खेळले असून २१५९ धावा केल्या असून ११४ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

सुरेश रैनाच्या मुलाचा वाढदिवस झाला साजरा, पाहा ज्युनियर रैनाचे गोंडस फोटो

राजस्थानमधून चेन्नईत ट्रेड झाल्यावर धोनीचा उथप्पाला कॉल; म्हणाला, ‘मी तुला निवडले नाही, तर..’

नव्वदीत बाद झालेल्या डिकवेल्लाने गाळले नावातील ‘K’ अक्षर, कारण गुलदस्त्यात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---