आगामी एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला बघता या हंगामातील सामन्यांचे आयोजन मुंबई शहरात केले जाणार होते. मात्र आता मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे आयोजनासाठी मुंबई शहराची एकमेव आयोजन स्थळ म्हणून निवड करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र होते. त्यामुळे मुंबईत असलेल्या चार सुसज्ज मैदानांवरच आयपीएलचे सगळे सामने आयोजित करण्याचा विचार केला जात होता. वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील आणि रिलायन्स असे चार अत्याधुनिक मैदानं मुंबईत आहेत. त्यामुळे एकटे मुंबई शहर संपूर्ण स्पर्धेचा भार पेलू शकत होते. मुंबईत जैव सुरक्षित वातावरणात खेळाडूंना ठेवून प्रवास टाळून हे आयोजन शक्य होते.
मात्र आता गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत आयोजन करणे, काहीसे कठीण वाटते आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलतांना सांगितले, “आयपीएल सुरु होण्यासाठी अजूनही एका महिन्याचा कालावधी बाकी आहे. पण अर्थात काही निर्णय आत्ताच घेणे आवश्यक आहे. केवळ एकाच मुंबई शहरात आयोजन करणे जोखमीचे असेल. कारण सध्या तिथे रुग्णसंख्येत मोठी वाढ होते आहे.”
पुढे ते म्हणाले, “त्यामुळे हैद्राबाद, बेंगलोर आणि कोलकाता यासारखी शहरे आयोजनासाठी तयार केली जातील. याशिवाय अशी देखील शक्यता आहे की आयपीएलच्या प्लेऑफ आणि अंतिम फेरीच्या आयोजनाची जबाबदारी अहमदाबादला देखील दिली जाऊ शकते.”
आयपीएलच्या आयोजनाची सुरुवात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. मागील वर्षी कोरोना विषाणूच्या महामारीमुळेच आयपीएलचे आयोजन युएईमध्ये केल्या गेले होते. यावर्षी मात्र भारतात हे आयोजन करायचे ठरवल्याने बीसीआयला बायो बबलसह इतर विशेष खबरदारी घेणे गरजेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
खरंच अहमदाबाद कसोटीची खेळपट्टी होती खराब? जाणून घ्या काय आहेत आयसीसीचे नियम
दोन दिवसात कसोटी जिंकताच ट्विटरवर भारतीय संघासाठी आला कौतुकाचा पूर, पाहा काही हटके ट्विट