भारतातील आयपीएल ही जगातील सर्वात प्रसिद्ध अशी टी20 क्रिकेट स्पर्धा आहे. ज्यामध्ये सुरुवातीपासूनच प्रत्येक संघाकडे विजेता संघ म्हणून पाहिला जाते. पण मुंबई इंडियन्स या संघाने आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. मागील 2 हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने सलग दोन वेळा विजेतेपद मिळविले असून यावर्षी मुंबईचा संघ विजेतेपदाच्या हॅट्रिकचे स्वप्न घेऊन आयपीएलमध्ये उतरणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ 9 एप्रिलपासून आपल्या आयपीएलच्या 14 व्या सत्राला सुरूवात करणार आहे, त्यांचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा विजयाचा दावेदार असल्याचे दिसत आहे. परंतु, त्यांच्यासाठी विजेतेपदाची हॅट्रिक साधणे सोपे असणार नाही. या लेखात आपण अशा कारणांचा आढावा घेऊ, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्यात अपयश येऊ शकते.
यावर्षी आयपीएलमधील कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही, त्यामुळे सर्व संघांना आपल्या घरच्या खेळपट्टीच्या फायद्याला मुकावे लागणार आहे. त्यानुसार मुंबई संघाला आपले पहिले पाच सामने चेन्नईच्या मैदानावर खेळावे लागतील. मुंबईच्या संघात चेन्नईच्या मैदानावर खेळण्यासाठी दर्जेदार फिरकीपटू नसल्यामुळे मुंबईचा संघ खूप अडचणीत येऊ शकतो.
मुंबई संघात कृणाल पंड्या, जयंत यादव, राहुल चहर आणि पीयूष चावला असे फिरकी गोलंदाज आहेत. कृणाल पंड्या हा धावांच्या गतीवर लगाम लावण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर जयंत यादवला गेल्या वर्षी फक्त 2 सामने खेळण्याची संधी मिळाली होती, पण हे दोन्ही खेळाडू विकेट मिळवण्यासाठी धडपडताना दिसले होते.
राहुल चहर हा गोलंदाज फक्त मुंबईसाठी एकमेव प्रभावी गोलंदाज असल्याचे दिसून आले आहे. या संघात पियुष चावलाचा ही समावेश आहे. परंतु संघाला मुंबईच्या संघाला अष्टपैलू खेळांडूंवरती अधिक विश्वास असल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वश्रेष्ठ 11 मध्ये त्याला स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा परिस्थितीत चेपॉकच्या मैदानावर फलंदाजांसमोर या गोलंदाजांची अग्निपरीक्षा असणार आहे.
मुंबई इंडियन्समध्ये दर्जेदार फिरकीपटू नसल्याने वेगवान गोलंदाजांवर विकेट घेण्याची जबाबदारी येणार आहे. अशा परिस्थितीत जर वेगवान गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले तर मुंबईची ताकद ही त्याची कमजोरी होईल आणि स्फोटक फलंदाजांनी सज्ज असलेले संघ सहज सामना जिंकतील. तसेच या परिस्थितीत नाणेफेकीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा फिरकीपटूंच्या अनुपस्थितीत प्रथम क्षेत्ररक्षण करताना विरूद्ध संघातील स्फोटक फलंदाजीमुळे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2021: एबी डिव्हिलियर्स पाठोपाठ ‘कॅप्टन’ कोहली चेन्नईत दाखल, पाहा फोटो
आयपीएल इतिहासातील ‘हे’ पाच क्षण चाहते कधीही नाही विसरणार