इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे केवळ आता आठवड्याचाच कालावधी राहिलेल्या या स्पर्धेची आतुरता सर्वांनाच जाणवत आहे. प्रत्येक संघानेही या हंगामासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक संघात त्यांचे खेळाडू दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे.
आयपीएल म्हटलं की चौकार षटकारांबरोबरच खेळाडूंनी केलेल्या विक्रमांचीही बरीच चर्चा होत असते. आगामी हंगामातही काही खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी आहे. अशाचकाही विक्रमांबद्दल जाणून घेऊ जे आयपीएलच्या १४ व्या हंगामात होऊ शकतात.
१. शिखर धवनला ६०० चौकार मारण्याची संधी
या आयपीएल हंगामात ९ चौकार पूर्ण करताच शिखर धवन ६०० चौकार पूर्ण करेल. त्यामुळे तो आयपीएलमध्ये ६०० चौकार मारणारा पहिलाच फलंदाज बनेल. त्याच्या नावावर सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ५९१ चौकार आहेत.
२. विराटला ६००० धावा करण्याची संधी
या हंगामात विराटने १२२ धावा करताच तो आयपीएलध्ये ६००० धावा करणारा पहिला फलंदाज बनेल. आत्तापर्यंत कोणीही आयपीएलमध्ये ६००० धावा केलेल्या नाही. सध्या विराटच्या नावावर ५८७८ धावा आहे. तसेच तो सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.
३. ख्रिस गेलला ३५० षटकार पूर्ण करण्याची संधी
युनिवर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा क्रिकेटपटू आहे. त्याने आत्तापर्यंत ३४९ षटकार मारले आहेत. त्यामुळे आगामी हंगामात आणखी एक षटकार मारताच तो ३५० आयपीएल षटकार पूर्ण करणारा क्रिकेटपटू ठरेल.
४. एबी डिविलियर्सला ५००० धावा पूर्ण करण्याची संधी
मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणाऱ्या एबी डिविलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ४८४९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आगामी हंगामात त्याला ५००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याचे येत्या हंगामात १५१ धावा केल्या की तो ५००० आयपीएल धावा पूर्ण करेल. हा टप्पा पार करणारा तो एकूण सहावा तर दुसरा परदेशी खेळाडू बनेल.
५. वॉर्नरचे अर्धशतकांचे अर्धशतक –
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असलेल्या डेव्हिड वॉर्नरने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक ४८ अर्धशतके केली आहेत. त्यामुळे आणखी २ अर्धशतकं करतानच तो ५० अर्धशतके पूर्ण करेल. असा कारनामा करणारा तो पहिलाच फलंदाज बनेल.
६. पोलार्डला २०० षटकारांची संधी
आयपीएलमध्ये पोलार्डने आत्तापर्यंत १९८ षटकार मारले आहेत. त्यामुळे आणखी २ षटकार मारताच तो २०० षटकार पूर्ण करेल. याआधी हा विक्रम ख्रिस गेल, एबी डिविलियर्स(२३५), एमएस धोनी(२१६), रोहित शर्मा(२१३) आणि विराट कोहली (२०१) या पाच खेळाडूंनाच करता आला आहे.
७. आर अश्विनला १५० विकेट्स पूर्ण करण्याची संधी
आर अश्विन या हंगामात १२ विकेट्स घेताच १५० आयपीएल विकेट्स पूर्ण करेल. त्याच्या नावावर सध्या १३८ विकेट्स आहेत. तसेच आत्तापर्यंत १५० आयपीएल विकेट्सचा टप्पा केवळ लसिथ मलिंगा (१७०), अमित मिश्रा (१६०), पियुष चावला (१५६), ड्वेन ब्रावो (१५३) आणि हरभजन सिंग (१५०) यांनाच गाठता आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरच्या ‘या’ खेळाडूला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करा; माजी विश्वविजेत्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा
घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
टीम इंडियाच्या खेळाडूने केली होती इंग्लंडमध्ये चोरी, संपुर्ण संघावर आली होती…