---Advertisement---

लग्नानंतर नववधूला घरी सोडून बुमराहची आयपीएल वारी, मुंबई इंडियन्सच्या गोटात दाखल; पाहा फोटो

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 5:15 PM
---Advertisement---

‘इंडिया का त्योहार’ अर्थात इंडियन प्रीमियर लीग २०२१ ची प्रतिक्षा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. ९ एप्रिल रोजी या हंगामाचा श्रीगणेशा होणार असून चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पहिली लढत होणार आहे. त्यामुळे पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेला मुंबई संघ बुधवारी (३१ मार्च) चेन्नईत पोहोचला आहे. त्यातही जसप्रीत बुमराहने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा हे मुंबईचे शिलेदार सहकुटुंब चेन्नईला गेले आहेत. मात्र नुकताच लग्नबंधनात अडकलेला बुमराह चेन्नई विमानतळावर एकटाच दिसला. अर्थातच तो त्याची पत्नी संजना गणेशनला सोबत घेऊन आला नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये त्याची जास्त चर्चा रंगली आहे.

मार्च १५, २०२१ रोजी जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी गोव्यामध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह केला होता. या विवाहात कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

बुमराहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांना माहिती दिली होती. फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, ‘प्रेम जर योग्य असेल, तर आपल्याला ते योग्य मार्ग दाखवते. आजपासून मी आणि संजनाने एकमेकांसोबत नवा प्रवास सुरू केला आहे. हा आमच्या जिवनातील सर्वात आनंदी दिवस आहे. आमच्या लग्नाची बातमी तुम्हा सर्वांना कळवण्यात मला आम्हाला खूप आनंद होत आहे.’

https://www.instagram.com/p/CMb2BtxHjgD/?utm_source=ig_web_button_share_sheet

कोण आहे संजना गणेशन?

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक  मॉडेल आणि अँकर आहे. तसेच ती आयपीएल स्पर्धेत प्रेसेंटर म्हणुन कार्यरत असते. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या लिलावात देखील ती होस्ट म्हणून पाहायला मिळाली होती. क्रिकेट व्यतिरिक्त ती बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांना देखील होस्ट करतांना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे कदाचित संजनाही आयपीएलच्या तयारीत व्यस्त असल्याने ती बुमराहसोबत उपस्थि राहू शकली नसावी.

महत्त्वाच्या बातम्या-

केकेआरच्या ‘या’ खेळाडूला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करा; माजी विश्वविजेत्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा

टीम इंडियाच्या खेळाडूने केली होती इंग्लंडमध्ये चोरी, संपुर्ण संघावर आली होती…

सीएसकेचे वाघ सज्ज! एकाच दिवशी निवृत्त झालेले धोनी-रैना उतरले मैदानात, पाहा खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---