---Advertisement---

कोलकाता नाइट रायडर्ससाठी आनंदची बातमी; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे लवकरच होणार भारतात आगमन

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 11:39 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला 9 एप्रिल पासून सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांची तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक संघ एकत्र जमण्यास सुरुवातही झाले आहे. तसेच परदेशातूनही क्रिकेटपटूंनी भारतात यायला सुरुवात केली आहे.

तत्पुर्वी कोलकाता नाइट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 2 एप्रिल रोजी भारतात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु केकेआरच्या कॅम्पमध्ये जाण्यापूर्वी त्याला 7 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन रहावे लागणार आहे. कोलकाता संघाला आपला पहिला सामना 11 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादशी खेळायचा आहे. त्यामुळे पॅट कमिन्स 9 एप्रिलपासून प्रशिक्षणासाठी उपलब्ध राहणार आहे.

सध्या ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना प्रवास करणे जरा कठीण झाले आहे. कारण तिथे कोरोना विषाणूने हाहाकार घातला आहे. एएनआयशी बोलताना या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 2 एप्रिल रोजी संध्याकाळी पॅट कमिन्स भारतात आगमन करणार आहे. सूत्रांचे असे म्हणणे आहे की, विमानाचे तपशील येणे बाकी आहे, परंतु तो संध्याकाळी थोडा उशीरा भारतात येणार आहे. त्यानंतर 7 दिवस त्याला क्वारंटाईन ठेवण्यात येईल.

बीसीसीआयच्या नियमांनुसार खेळाडूंना त्यांच्या सहाय्यक कर्मचार्यांना आणि संघ व्यवस्थापनाकांना संबंधित हॉटेल्समध्ये 7 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे आणि त्यानंतर तेथूनच बायो बबलमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. यामध्ये प्रत्येक खेळाडू आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची बर्‍याच वेळा कोरोना चाचणी देखील केली जाईल आणि ज्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह येईल अशाच व्यक्तिंना बायोबबलमध्ये जाता येईल.

पॅट कमिन्सला केकेआर संघाने मागील वर्षी 15 .5 कोटी रुपयांच्या किंमतीत विकत घेतले होते. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महाग परदेशी खेळाडू ठरला होता. मात्र यंदा राजस्थान रॉयल्स संघाने 16.25 कोटीमध्ये विकत घेतलेल्या ख्रिस मॉरिसने त्याचा विक्रम मोडला आहे.

आयपीएल 2021 चा आगाज 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. परंतु, केकेआरचा संघ 11 एप्रिलपासून सनरायझर्स हैदराबादशी खेळून त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. कोलकाताचे दोन प्रमुख खेळाडू सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यापूर्वीच मंगळवारी भारतात दाखल झाले असून सध्या ते क्वारंटाईनमध्ये आहेत. क्वारंटाईननंतर ते केकेआर संघात सामील होऊन प्रशिक्षणास सुरूवात करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

नाद करायचा नाही! वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा २० पेक्षा अधिक षटकार ठोकणारे संघ, भारताचा तर उल्लेखही नाही

धू धू धुतलं! स्टोक्सने ५२ चेंडूत ठोकले १० खणखणीत षटकार, ‘या’ फलंदाजांची केली बरोबरी

दुर्दैवी बेन स्टोक्स, अवघ्या एका धावेने हुकले वनडे शतक; नकोशा यादीत झाला समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---