---Advertisement---

आजपासून सुरू होणार आयपीएल २०२१ चा महासंग्राम; पाहा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभाव्य प्लेइंग XI

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 10:24 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा पहिला सामना आज (०९ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. उभय संघात एकाहून एक जबरदस्त खेळाडूंची भरमार आहे. त्यामुळे हा सामना अतिशय रोमांचक होणार हे निश्चित आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन इलेव्हन कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. सलामी जोडी बाद झाल्यानंतर युवा शिलेदार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन संघाला डाव सांभाळताना दिसतील. तर मधल्या आणि खालच्या फळीत हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्ड हे धाकड फलंदाजीस उतरतील.

मुंबई संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर असेल. राहुल चाहर, पियुष चावला आणि जिम्मी निशम यांचाही गोलंदाजी विभागात समावेश असू शकतो. बेंगलोरसारखा बलाढ्य संघ पुढे असल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याला आयपीएल पदार्पणासाठी अजून प्रतिक्षा करावी लागू शकते.

पहिले जेतेपद जिंकण्यासाठी आसुसलेला बेंगलोर संघाडून देवदत्त पड्डीकल, कर्णधार विराट कोहली यांची सलामी जोडी मैदानावर दिसेल. तसेच बेंगलोर संघ ग्लेन मॅक्सवेलला पहिल्या सामन्यात आजमावू शकतो. याबरोबरच कोटींमध्ये पैसा मोजत आपल्या ताफ्यात सहभागी केलेल्या वेगवान गोलंदाज कायल जेमिसन यालाही संधी दिली जाऊ शकते. याबरोबरच नवोदित शिलेदार सचिन बेबी आणि रजत पाटीदार यांनाही अंतिम पथकात स्थान दिले जाऊ शकते.

मुंबई इंडियन्सची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, पियूष चावला आणि जिम्मी नीशम

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभावित प्लेइंग इलेव्हन 
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, एबी डिविलियर्स, युझवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कायल जेमीसन, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी आणि रजत पाटीदार

महत्त्वाच्या बातम्या-

MI आणि RCB आज येणार आमने सामने, कुठे व केव्हा होणार पहिला आयपीएल सामना; जाणून घ्या सर्वकाही

मी सराव करुन परतलो आणि वडीलांचे निधन झाल्याचे कळाले; सिराजचा दु:खद आठवणींना उजाळा

आयपीएल २०२१ चा उद्घाटन सोहळा ठरणार खास, पहिल्यांदाच दिसणार ‘हे’ विशेष दृश्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---