इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३२ वा सामना मंगळवार रोजी (२१ सप्टेंबर) पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. हा सामना जिंकत पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, आपापल्या संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टिकवून ठेवण्यासाठी झगडताना दिसतील. दरम्यान या सामन्यांत बरेचसे नवे विक्रम बनताना आणि जुने विक्रम मोडतानाही दिसतील. सलामीवीर फलंदाज राहुल याच्याकडेही या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी असेल.
२९ वर्षीय राहुल सध्या उत्तम लयीत आहे. त्याने नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडला होता. यापूर्वीच्या भारतात झालेल्या आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातही त्याने ७ सामन्यात ३३१ धावा फटकावल्या होत्या. अशात राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जर त्याने २२ किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तर तो आयपीएलमधील आपल्या ३००० धावांचा आकडा गाठेल.
राहुलने आतापर्यंत ८८ आयपीएल सामन्यांतील ७९ डावांमध्ये फलंदाजी कताना २९७८ धावा चोपल्या आहेत. त्यामुळे जर २२ धावा करत त्याने आपल्या ३००० धावा पूर्ण केल्यास तो आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा केवळ दुसरा फलंदाज बनेल. आयपीएलमध्ये सर्वात वेगाने ३००० धावा करण्याचा विक्रम त्याचाच संघ सहकारी आणि विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये ७५ डावांमध्ये हा मैलाचा दगड पार केला होता.
सर्वाधिक धावांमध्ये राहुल दुसऱ्या क्रमांकावर
आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा बाबतीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन सर्वाधिक ३८० धावांवर अव्वलक्रमांकावर आहे. अशात ४९ धावा करत धवनला मागे टाकण्यावरही राहुलची नजर असेल. जर त्याने अर्धशतक करत धवनला मागे सोडले तर, सर्वाधिक धावांसाठी मिळणारी ऑरेंज कॅप राहुलच्या डोक्यावर सजेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला बघावी लागेल वाट? राजस्थानविरुद्ध ‘असा’ असेल पंजाबचा संघ
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित उतरणार राजस्थान रॉयल्स, पाहा संजूच्या संघाची ‘संभाव्य प्लेइंग इलेव्हन’
हे काय? धावबाद झाल्याने संतप्त फलंदाजाने सहकाऱ्यालाच फेकून मारली बॅट, व्हिडिओची चर्चा






