आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना हंगामातील सर्वात मनोरंजक सामन्यांपैकी एक ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने या सामन्यात चेन्नईने दिलेले मोठे आव्हान ७ विकेट्स राखून गाठले आणि विजय मिळवळा. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १८९ धावा केल्या होत्या आणि यामध्ये त्यांचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे मोठे योगदान राहिले.
ऋतुराजने ६० चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. तसेच त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर एक मोठा, १०८ मीटरचा षटकार मारला आणि हंगामातील सर्वात लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.
चाहत्यांमध्ये नेहमीच कोणत्या खेळाडूने किती मीटरचा षटकार मारला, यासाठी उत्सुकता असते. आयपीएलच्या १४ व्या हंगामात तो मान ऋतुराज गायकवाडने पटकावला आहे. राजस्थानविरुद्धच्या २ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात त्याने १०८ मीटरचा षटकार मारून हा विक्रम केला आहे. त्याच्यापूर्वी यंदाच्या हंगामात बऱ्याचशा फलंदाजांच्या बॅटमधून लांबच लांब षटकार निघाले आहे. त्याच टॉप-१० षटकारांची यादी आम्ही तुमच्या भेटीस आणली आहे. चला तर पाहूया, आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत कोणत्या कोणत्या खेळाडूंनी सर्वात लांब षटकार मारले आहेत?
१ – ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) – १०८ मीटर
२ – कायरन पोलार्ड (Kieron Pollard) – १०५ मीटर
३ – कायरन पोलार्ड (Kieron Pollard) – १०३ मीटर
४ – ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) – १०३ मीटर
५ – ग्लेंन मॅक्सवेल (Glenn Maxwell) – १०० मीटर
६ – सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) – ९९ मीटर
७ – सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) – ९८ मीटर
८ – ऋतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad) – ९८ मीटर
९ – कायरन पोलार्ड (Kieron Pollard) – ९७ मीटर
१० – हार्दिक पांड्या (Kieron Pollard) – ९७ मीटर
दरम्यान, चेन्नई आणि राजस्थानच्या सामन्या चेन्नईने दिलेल्या १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने अवघ्या १७.३ षटकांमध्ये ते लक्ष्य गाठले. राजस्थानच्या यशस्वी जयस्वाल ५० आणि शुभम दुबेने नाबाद ६४ धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वालने त्याचे अर्धशतक अवघ्या १९ चेंडूत पूर्ण केले. राजस्थानच्या विजयानंतर प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
… अन् चाहत्यांच्या काळजात झाले चर्र! फाफ आणि मुस्तफिजुरमध्ये जोराची धडक, मैदानावरच लागले विव्हळू
अबुधाबीमध्ये ऋतु’राज’! आयपीएल २०२१ मधील सर्वात लांब षटकारासह गायकवाडने केले शतक पूर्ण, पाहा व्हिडिओ
पावरप्लेमध्ये जयस्वालचा झंझावात, ताबडतोब अर्धशतक ठोकत रैना-राहुलसारखी कामगिरी करण्यात ‘यशस्वी’