---Advertisement---

संकट वाढलं! खेळाडू-ग्राऊंड्समनपाठोपाठ आयपीएलशी संबंधित ‘हे’ महत्त्वाचे लोकही झाले मुंबईत कोरोना पॉझीटिव्ह

On: मंगळवार, एप्रिल 6, 2021 12:38 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या आयोजनात रोज नविन आव्हाने येत आहेत. दररोज कोरोनाशी संबंधीत काहीतरी गोष्टी घडत आहे व त्याचा स्पर्धेच्या आयोजनावर परिणाम होताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व सर्व संघांच्या अधिकाऱ्यांनी आयपीएलचे मुख्य प्रसारक असलेल्या स्टार स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांसाठी बायो-बबल तयार केला आहे. असे असूनही कोरोनाच्या घटना समोर येत आहे. आता स्टार स्पोर्ट्सच्या टीममधीलच काही लोकं कोरोना संक्रमित झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

पहिले खेळाडू व त्यानंतर वानखेडे स्टेडियमवरील कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्यानंतर आता स्टार स्पोर्ट्सचे १४ कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हे सर्व कर्मचारी एका हॉटेलमध्ये बायो-बबलमध्ये होते व तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यात मुंबई व पुणे शहरं आघाडीवर आहेत. अशातच वानखेडे स्टेडियमवर सामने होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. अशातच राज्य शासनाने हे सामने खेळायला परवानगी दिली आहे. तसेच बीसीसीआयनेही येथील सामने इतरत्र हलवायला नकार दिला आहे. मुंबईत आयपीएलसाठी आलेल्या काही खेळाडूंना व वानखेडे स्टेडियमवरील काही ग्राऊंड्समनला कोरोना झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही वृत्त समोर आले होते. परंतू मंगळवारी स्टेडियमवरील ३ कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे वृत्त नव्याने समोर आले आहे तसेच हॉटेलमध्ये बायो-बबलमध्ये असलेले स्टार स्पोर्ट्सचे १४ कर्मचारी संक्रमीत झाले असल्याचे बोलले जात आहे.

कॅमेरामनपासून डायरेक्टरपर्यंत कर्मचारी संक्रमित
मुंबईमधील फाईव्ह स्टार हॉटेल फोर सिझन्समध्ये थांबलेले स्टार स्पोर्ट्सचे १४ कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. हे सर्व कर्मचारी बीसीसीआयच्या बायो-बबलचा हिस्सा होते. या १४ कर्मचाऱ्यांमध्ये कॅमेरामन, प्रोड्युसर, डायरेक्टर व अन्य सहायकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही टीम वर्ल्ड फीड अर्थात जगात आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या टीमचा भाग आहेत.

मुंबईमध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्ज संघ हॉटेलवर थांबलेले आहेत. हे चारही संघ वानखेडेवर सामने खेळणार आहेत. १० एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध दिल्ली आयपीएलचा दुसरा सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोणी स्पॉट फिक्सिंग केली तर कोणी प्रतिस्पर्धाच्या किनशिलात मारली; ‘ते’ मोठे वाद ज्यामुळे आयपीएलचं नाव पार धुळीस मिळालं

आयपीएल २०२१: बापाने क्रिकेटर बनवण्यासाठी सोडली नोकरी, आता लेक आपल्या नेतृत्त्वाखाली बदलणार RR चं नशीब

आयपीएल २०२१ नंतर धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीवर लागणार कायमचा ब्रेक? ‘या’ गोष्टी देत आहेत निवृत्तीचे संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---