---Advertisement---

अरे व्वा! केवळ हिंदी, मराठी नव्हे तर ‘या’ ८ भाषांमध्ये ऐकायला मिळणार आयपीएल सामन्यांचा थरार

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 11:24 AM
IPL-Captains
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2021 हंगामाची तयारी पूर्ण झाली असून काहीच तासांमध्ये या आयपीएलचा रणसंग्राम आपल्याला पहावयास मिळणार आहे. त्यामध्ये चाहत्यांनी त्यांच्या आवडीच्या संघांचा उत्साह आणि समर्थन वाढविण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली आहे. अशात या हंगामात टूर्नामेंट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स आयपीएल स्पर्धेचे मोठ्या प्रमाणात प्रसारण करणार असून त्यांनी इंग्रजीव्यतिरिक्त, सात भाषांमध्ये जगभरात कॉमेंट्री करण्याचे ठरवले आहे.

शुक्रवारी (9 एप्रिल) चेन्नईत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने आयपीएलला सुरूवात होणार आहे. तर 30 मे पर्यंत या स्पर्धेचा थरार चालू राहणार आहे. मैदानावरील खेळाबरोबरच कॉमेंटेटर या सामन्याची स्थिती प्रेक्षकांना सांगून हा थरार वाढविण्याचे काम करत असतात. यावेळी कॉमेंट्रीची विस्तारता अजून वाढली आहे.

सुनील गावस्कर, गौतम गंभीर आणि केविन पीटरसन यांच्याखेरीज भारतासह जगभरातील माजी दिग्गज क्रिकेटपटू या आयपीएल स्पर्धेचे विश्लेषण करताना दिसणार आहेत. मात्र यावेळी स्टार स्पोर्ट्सने हिंदीसह सात भारतीय भाषांमध्ये ही स्पर्धा प्रसारित करण्याची जबाबदारी घेतली आहे.

स्टार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी स्पर्धा विश्लेषण संघात विविध भाषेतील सर्वोत्कृष्ट माजी क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि मराठी या भाषांचा समावेश आहे.”

तत्पुर्वी स्टार स्पोर्ट्सने आपली स्पर्धा समालोचकांचा संघ जाहीर केला असून यामध्ये विशेषतः हिंदी आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या इंग्रजी भाषेवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

हिंदी आणि इंग्रजी स्पर्धा समालोचन संघातील सदस्य –

हिंदी संघातील सदस्य –
आकाश चोपडा, निखिल चोपडा, गौतम गंभीर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, आरपी सिंह, दीप दासगुप्ता, किरण मोरे आणि जतिन सप्रू. याखेरीज सुनील गावस्कर हे इंग्रजी आणि हिंदी दोन्हीमध्ये समालोचन करण्याची जबाबदारी घेणार आहेत.

इंग्रजी संघातील सदस्य –
हर्षा भोगले, सुनील गावस्कर, इयान बिशप, डॅनी मॉरिसन, केविन पीटरसन, सायमन डूल, मायकेल स्लेटर, मुरली कार्तिक, मार्क निकोलस. याव्यतिरिक्त इतर अनेक समालोचकांना येत्या काळात समावेश केला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माही’वर जीव ओवाळून टाकणाऱ्या अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर नात्याला म्हटले होते मोठी चूक, आता ‘या’ कारणामुळे आली चर्चेत

आजपासून सुरू होणार आयपीएल २०२१ चा महासंग्राम; पाहा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभाव्य प्लेइंग XI

MI आणि RCB आज येणार आमने सामने, कुठे व केव्हा होणार पहिला आयपीएल सामना; जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---