---Advertisement---

रोना मना हैं! भावुक झालेल्या पदार्पणवीरासोबत नारायणची गमतीशीर कृती, कर्णधारालाही फुटलं हसू

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 9:36 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या ४५ व्या सामन्यात शुक्रवारी (१ ऑक्टोंबर) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर पाच विकेट्स आणि तीन चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात केकेआर संघाने न्यूझीलँडचा विस्फोटक फलंदाज टिम सेफर्टला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले होते. त्याचा हा आयपीएलमधील पहिलाच सामना होता. टिम सेफर्टला केकेआरने मागच्या वर्षी संघात सामील केले होते, पण अद्याप त्याने एकही सामना खेळला नव्हता. दरम्यान त्याला संधी मिळाल्यानंतर केकेआरचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन आणि त्याच्यामध्ये एक मजेदार प्रसंग पाहायला मिळाला आहे.

केकेआरचा वेगवान गोलंदाज लाॅकी फर्ग्यूसन या सामन्यातून बाहेर होता आणि त्याऐवजी संघाने टिम सेफर्टला संधी दिली होती. सामन्यापूर्वी ब्रँडम मॅकुलमने त्याला पदार्पणाची कॅप दिली आणि तो त्यावेळी थोडा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच फिरकी गोलंदाज सुनील नरेन आला आणि त्याची चेष्टा केल्याचे दिसले आहे.

सुनील नरेनने मजेशीर अंदाजात टिम सेफर्टचे डोळे पुसण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले आहे. टिम काही बोलणार त्याआधी सुनील आला आणि अशी चेष्टा करून तेथून निघून गेला. त्यांच्या दोघांतील हा प्रसंग चाहत्यांना खूपच आवडला आहे.

https://twitter.com/pant_fc/status/1443971098501005317?s=20

दरम्यान, सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली आणि केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. केकेआरने सात विकेट्सच्या नुकसानावर २० षटकात १६५ धावा केल्या होत्या. यामध्ये वेंकटेश अय्यरने सर्वाधिक ६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने पाच विकेट्स गमावत १९.३ षटकात केकेआरने दिलेले लक्ष्य गाठले आणि सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने ६७ धावांची महत्वाची खेळी केली आणि त्याला सामनावीर निवडले गेले.

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त कसोटी नव्हे वनडेतही स्म्रीतीचे ऑस्ट्रेलियन भूमीत शतक, हा अद्वितीय विक्रम करणारी पहिलीच भारतीय

घासून नाही ठासून येणार! आयपीएल २०२०मधील नामुष्कीनंतर धोनीच्या ‘त्या’ संदेशामुळे सीएसकेचे ढासू कमबॅक

कर्णधार मॉर्गनचा फ्लॉप शो सुरूच, तब्बल ‘इतक्यांदा’ एकेरी धावा करत नकोशा विक्रमांत बनला अव्वल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---