इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १४ वा हंगाम असून या हंगामासाठी आता सर्वच संघ तयारीला लागले आहे. अशातच सनरायझर्स हैदराबाद संघात एक मोठा बदल झालेला पाहायला मिळणार आहे.
आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने अगामी आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. त्याने मोठ्या कालावधीसाठी बायोबबलमध्ये राहाणे कठीण असल्याच्या कारणाने आयपीएलच्या १४ व्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्श मागच्या हंगामात सुरुवातीचे काही आयपीएल सामने खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे मागचा हंगामही तो पूर्ण खेळू शकला नव्हता.
जेसन रॉयला संधी
मार्शने माघार घेतल्याने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला हैदराबादने मार्शचा बदली खेळाडू म्हणून हैदराबादने आगामी आयपीएल हंगामासाठी संघात स्थान दिले आहे. त्याला हैदराबाद १४ व्या आयपीएल हंगामासाठी २ कोटी रुपये देणार आहे. जी त्याची आयपीएल २०२१ च्या लिलावावेळी मुळ किंमत होती.
Due to personal reasons, Mitchell Marsh will be opting out of #IPL2021.
We would like to welcome @JasonRoy20 to the #SRHFamily! 🧡#OrangeOrNothing #OrangeArmy pic.twitter.com/grTMkVUns4
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 31, 2021
लिलावात कोणीही घेतले नाही म्हणून नाराज होता रॉय
जेसन रॉयने मागीलवर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असताना आयपीएलमधून वैयक्तिक कारणाने माघार घेतली होती. त्यानंतर दिल्लीने त्याला २०२१ च्या आयपीएल हंगामाआधी संघातून मुक्त केले होते. त्यामुळे रॉय २ कोटी या मुळ किंमतीसह आयपीएल लिलावात उतरला होता. मात्र, त्याला या लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता.
त्यानंतर त्याने ट्विट करत त्याची नाराजी व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते की यंदा आयपीएलचा भाग होता न येण्याबद्दल नाराज असल्याचे म्हटले होते.
Massive shame not to be involved in the @IPL this year but wanted to congratulate all the lads that did get picked up. Especially some of the high rollers. Going to be good to watch 👊🏼
— Jason Roy (@JasonRoy20) February 18, 2021
तसेच रॉयने आयपीएल लिलावानंतर भारताविरुद्ध मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने ३ वनडे सामन्यांमध्ये ११५ धावा केल्या होत्या. तसेच ५ टी२० सामन्यांमध्ये १४४ धावा केल्या होत्या. याच कामगिरीमुळे त्याला हैदराबादने संधी दिली असू शकते.
रॉयने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १ अर्धशतकासग १७९ धावा केल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादचा आयपीएल २०२१ साठी संघ
डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, मनिष पांडे, वृद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, बेसिल थँपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर ,अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग, केदार जाधव, मुजीब झारदान, जे सुचिथ.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित-सचिन तर सर्वांनाच माहित आहे, परंतू हे ५ सितारेही झाले होते मुंबईचे कर्णधार
‘या ‘दिवशी किंग कोहली करतोय आरसीबीच्या ताफ्यात प्रवेश
यंदा नव्या नावासह उतरणाऱ्या पंजाबने आयपीएल २०२१ साठी लाँच केली नवी जर्सी, पाहा व्हिडिओ