---Advertisement---

सीएसके अन् केकेआर येणार आमने सामने; ‘अशी’ असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 2:49 PM
CSK vs KKR
---Advertisement---

जगभरातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग होय. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी (२६ सप्टेंबर) डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील सुरुवातीचे दोन्हीही सामने सीएसकेने आपल्या खिशात घातले आहेत. यावेळी ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. दुसरीकडे केकेआरनेही दुसऱ्या टप्प्याती पुनरागमन करत दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र, केकेआर गुणतालिकेत चौथ्या स्थानी विराजमान आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून आपले गुणतालिकेतील स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या एकूण ९ सामन्यांपैकी ७ सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित २ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. सीएसकेची कामगिरी पाहता त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे केकेआरने आपल्या ९ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ५ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दोन्ही संघामध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर सीएसकेचं पारडं जड आहे. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध आतापर्यंत २६ सामने खेळले आहेत. यामध्ये सीएसकेने १६ सामने, तर केकेआरने ९ सामने जिंकले आहेत.

आज होणाऱ्या सामन्यासाठी कदाचितच दोन्ही संघ बदल करतील. दोन्ही संघांनी आपले मागील दोन सामने जिंकले असल्याने ते आपल्या संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे. केकेआरला सीएसकेविरुद्धच्या सामन्यात वेंकटेश अय्यरकडून जबरदस्त प्रदर्शनाची अपेक्षा असेल. तसेच शुबमन गिलही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे सीएसकेचा जबरदस्त फलंदाज ऋतुराज गायकवाडने संपूर्ण लीगमध्ये शानदार कामगिरी केली आहे. तसेच ड्वेन ब्राव्होने मागील सामन्यात सीएसकेकडून शानदार पुनरागमन केले होते.

अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन-
चेन्नई सुपर किंग्स-
ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, एमएस धोनी (यष्टीरक्षक, कर्णधार) रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि जॉश हेजलवूड

कोलकाता नाईट रायडर्स-
शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऑयन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा

महत्त्वाच्या बातम्या-

-ज्याने पंजाबच्या तोंडून हिसकावला असता सामना, त्याच खेळाडूचे कर्णधार राहुलने गायले खूप गुणगान

-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!

-क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---