दिल्ली। शनिवारी (१ मे) अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामातील सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात कायरन पोलार्डने त्याच्या अष्टपैलू कामगिरीने मोलाचे योगदान दिले. या सामन्यानंतर अनेक मीम्स व्हायरल झाले.
पोलार्डची अष्टपैलू कामगिरी
आयपीएलमधील हाय वोल्टेड समजला जाणारा हा सामना मुंबईला जिंकून देण्यात पोलार्डचे योगदाने मोठे होते. त्याने आधी गोलंदाजी करताना लागोपाठच्या चेंडूवर अर्धशतकी खेळी केलेल्या फाफ डू प्लेसिस आणि सुरैश रैनाला बाद करत चेन्नईच्या धावगतीला लगाम लावला होता.
तसेच नंतर चेन्नईने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकावेळी ८१ धावांवर ३ विकेट्स अशी मुंबईची अवस्था झाली असताना स्वत:च्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी घेत ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची खेळी केली आणि मुंबईला सामना जिंकून दिला. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
चाहत्यांची प्रतिक्रिया
मुंबईच्या या विजयानंतर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. विशेषत: पोलार्डबद्दल बऱ्याच गमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एका चाहत्याने ‘बॉईज रिलॅक्स’ असे लिहिलेले मीम शेअर केले आहे. तर एका चाहत्याने ट्विट केले की ‘मानलं पोलार्ड तात्याला.’ दुसऱ्या एका चाहत्याने ‘आयुष्य सुंदर आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी पोलार्ड तात्या सारखं पाय रोवून मैदानात थांबता आलं पाहिजे,’ असे ट्विट केले.
@mipaltan मानलं पोलार्ड तात्या ला 🙏🙌🔥🔥
— Prasad Tare (@PrasadTare8) May 1, 2021
आयुष्य सुंदर आहे.
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी
पोलार्ड तात्या सारखं पाय रोवून
मैदानात थांबता आलं पाहिजे.
😄😂🤣🤣😄#MIvsCSK— YO shelar (@im_yo21) May 1, 2021
King Pollard supremacy🔥#IPL2021 #CSKvsMI #MIvCSK pic.twitter.com/uUzTakx6Zg
— Fenil Kothari (@fenilkothari) May 1, 2021
पोलार्ड भाऊंचा विजय असो..🎉
नुस्ता धुराळा केला भाऊ नी❤️❤️❤️— Prasad Wadekar (@prasad_wadekar) May 1, 2021
Sorry I am late but .. dekh lo🤣
.
.#CSKvMI #AmbatiRayudu #mumbaiindians #Ambani #Krunalpandya #pollard pic.twitter.com/nzrn2CA6rg— S A H I L (@SahilShegaonkar) May 1, 2021
https://twitter.com/RajaSamson9/status/1388590065060777985
🌟Kieron Pollard 🌟
in Today Match🏏🏏🏏
For MI fans For CSK fans pic.twitter.com/v7SDsd8JyY— 𝕵𝖆𝖘𝖍𝖔𝖇𝖆𝖓𝖙𝖆 𝕸𝖊𝖍𝖊𝖗 🇮🇳 (@JMeher07) May 1, 2021
Pollard after winning the match #CSKvsMI #ElClassico pic.twitter.com/6dvZtyQ42W
— Karan (@DevKaranRajput7) May 1, 2021
#Pollard #CSKvMI pic.twitter.com/arBrKP59PA
— Saurabh Yadav (@Saurabh74170102) May 1, 2021
https://twitter.com/babasho_tweets/status/1388554472373190659
MI fans to CSK fans rn :- #CSKvsMI pic.twitter.com/QSdCpUBixu
— Suren (@Arrre_yaar) May 1, 2021
https://twitter.com/Dhoni_workshop/status/1388554704603340803
https://twitter.com/Jerrysk2003/status/1388575036819136513
https://twitter.com/its_chavann/status/1388574686091436033
चेन्नई वाल्यांचा झोपायला नकार!
डोळे मिटले की,पोलार्ड तात्या दिसतोय म्हणे!
😂😂😂— Harshad Bhosale (@Harshbhosale03) May 1, 2021
रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय
शनिवारी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २१८ धावा केल्या. चेन्नईकडून मोईन अलीने ३६ चेंडूत ५८ धावा, फाफ डू प्लेसिसने २८ चेंडूत ५० धावा आणि अंबाती रायडूने २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची अर्धशतकी खेळी केल्या. तसेच मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईने २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८१ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कायरन पोलार्डने कृणाल पंड्याला साथीला घेत ८९ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे मुंबईच्या विजयाच्या अशा पल्लवित झाल्या. पोलार्डने नाबाद ८७ धावा केल्या. तसेच मुंबईकडून कृणालने ३२, रोहित शर्माने ३५ आणि क्विंटन डी कॉकने ३८ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
पराभवानंतरही चेन्नई गुणतालिकेत अव्वल
चेन्नईला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला असला तरी सध्या ७ सामन्यांतील ५ विजय आणि २ पराभव स्विकारत १० गुणांसह गुणतालिकेत चेन्नई अव्वल क्रमांकावर आहे. त्यांच्यापोठोपाठ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आहेत. त्यांचेही १० गुण आहेत, मात्र नेटरनरेटच्या फरकाने चेन्नईने अव्वल स्थान कायम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई आणि चेन्नईच्या उत्कंठावर्धक सामन्यादरम्यान धवल कुलकर्णीचा ‘हा’ मोठा विक्रम राहिला दुर्लक्षित
‘मॅचविनर’ पोलार्डच्या ‘त्या’ ८ गगनभेदी षटकारांची मेजवानी, पाहा व्हिडिओ