---Advertisement---

Video: ‘धूमधडाक्यासाठी तयार राहा’; हसरंगा अन् चमीराचा आरसीबीच्या चाहत्यांना खास संदेश

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 9:11 PM
---Advertisement---

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यावर्षीचा आयपीएलचा हंगाम कोरोनामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आाला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बायो-बबलमध्ये असलेल्या खेळाडूंना कोरोणाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला होता. याच हंगामातील राहिलेले सामने आता यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. यूएईमधील सामने सुरू होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) त्यांच्या संघात तीन नवीन खेळाडू सामील केले आहे. यातील दोन खेळाडूंनी संघाच्या चाहत्यांसाठी एका व्हिडिओद्वारे खास संदेश दिला आहे.

व्हिडिओतील दोन खेळाडू वानिंदु हसरंगा आणि दुष्मंथा चमीरा आहेत. या दोघांचा हा खास व्हिडिओ आरसीबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पोस्ट केला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोघांच्या चेहऱ्यावर आरसीबी संघासाठी खेळण्याची उत्सुकता स्पष्टपणे दिसत आहे.

व्हिडिओत सरुवातीला हसरंगा दिसत आहे. तो सुरूवातीला म्हणतो, “नमस्कार मित्रांनो, मी वानिंदु हसरंगा आहे. मी आरसीबीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साहित आहे. ही एक मजेदार सवारी असणार आहे. आमच्या सोबत जोडले जा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. घरी राहा सुरक्षित राहा.”

https://twitter.com/RCBTweets/status/1430057396232069121?s=20

हसरंगानंतर व्हिडिओत गोलंदाज दुष्मंथा चमीरा दिसत आहे. चमीरानेही आरसीबीसोबत खेळण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. तो या व्हिडिओत म्हणतो, “मी श्रीलंकेचा दुष्मंथा चमीरा आहे. मी आयपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर परिवारासोबत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. मी आरसीबीसाठी १००%  देण्यासाठी तयार आहे. धुम-धडाका पाहण्यासाठी तयार राहा. घरात राहा, मास्क घाला, आरसीबीला समर्थन करत राहा. लपकरच भेटू, आतासाठी निरोप घेतो.”

आरसीबीचा संघ गुणतालीकेत १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. संघाने खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ५ सामन्यांत विजय मिळवले आहेत. तसेच ते त्यांच्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी २ सामन्यात पराभूत झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

त्याला स्वत:च्या रंगात रंगलेले पाहून आनंद झाला, तो डोळ्यांत डोळे घालून खेळणारा गोलंदाज – विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेचा ‘जादुई गोलंदाज’ राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात! जागतिक टी-20 क्रमवारीत आहे अव्वलस्थानी

पुजाराला दहाव्यांदा बाद करताच इंग्लिश प्रेक्षकांकडून ‘असे’ झाले ३९ वर्षीय अँडरसनचे कौतुक, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---