जगातील सर्वात लोकप्रिय टी२० क्रिकेट स्पर्धा म्हणून आयपीएल स्पर्धेची ओळख आहे. आयपीएलचा आगामी हंगाम २६ मार्चपासून खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आगामी हंगामाचा पहिला सामना खेळला जाणार आहे. मागच्या हंगामात सीएसके आणि केकेआर अंतिम सामन्यात आमने सामने होते आणि सीएसकेने विजेतेपद पटकावले होते. याच पार्श्वभूमीवीर आगामी हंगामाचा पहिला सामना या दोन संघात खेळला जाईल. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ५ गोलंदाजांपैकी ४ गोलंदाज यावर्षी मैदानात दिसणार नाहीत.
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये जगभरातील दिग्गज सहभागी होणार असले तरी, स्पर्धेत त्या ५ गोलंदाजांपैकी ४ गोलंदाज खेळताना दिसणार नाहीत, ज्यांनी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंका संघाचा दिग्गज लसिथ मलिंग (Lasith Malinga) आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. मलिंगाने या लीगमध्ये १७० विकेट्स घेतल्या आणि २०१९ नंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. आयपीएमध्ये ५ ट्रॉफी जिंकणारा संघ मुंबई इंडियन्सासाठी मलिंगा अनेक वर्ष खेळला.
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १६७ विकेट्स घेतल्या आहेत. आगामी हंगामात ब्रावो सीएसकेसाठी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहे आणि मलिंगाचा विक्रम मोडण्याची संधी त्याच्याकडे असेल.
लेग स्पिन अमित मिश्रा (Amit Mishra) याला आयपीएलच्या मेगा लिलावात खरेदीदार मिळाला नाही. मागच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत होता. आयपीएलमध्ये ३ वेळा विकेट्सची हॅट्रिक करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १६६ आयपीएल विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या आहेत. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय लेग स्पिनर पियूष चावला (Piyush Chawla) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत १५७ आयपीएल विकेट्स नावावर केल्या आहेत. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेने आतापर्यंत १५० आयपीएल विकेट्स घेतल्या आहेत आणि तो या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. तसेच पियुष चावला आणि हरभजन सिंग देखील यंदा आयपीएलमध्ये दिसणार नाही.
आयपीएलमध्ये १५० विकेट्सटचा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये या ५ गोलंदाजांव्यतिरिक्त कोणीच नाही. यातील केवळ ब्रावो हा एकमेव गोलंदाज आहे, जो आयपीएल २०२२ मध्ये खेळणार आहे.
अश्विनला मिश्राचा विक्रम मोडण्याची संधी
भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४५ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अमित मिश्रा पहिल्या क्रमांकावर आहे. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आगामी आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अश्विनने जर या हंगामात २२ विकेट्स घेतल्या, तर तो मिश्राला मागे टाकून आयपीएमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
Womens World Cup 2022: न्यूझीलंड संघाची कर्णधार चालू सामन्यातून बाहेर; कारण घ्या जाणून
सामना पाहाताना गॅलरी कोसळली अन् शेकडो माणसे चेंगरली, अंगाचा थरकाप उडवणारा Video व्हायरल
IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा