---Advertisement---

‘ओम फिनिशाय नम:’, पाकिस्तान, इंग्लंडसह जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांनी केले धोनीचे कौतुक, वाचा एका क्लिकवर

On: शुक्रवार, एप्रिल 22, 2022 7:44 PM
MS-Dhoni-CSK
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक आहे. गुरुवारी (२१ एप्रिल) धोनीने पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज होती, ज्या धोनीने मिळवून दिल्या. सामन्याचा जबरदस्त शेवट केल्यानंतर जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी धोनीचे कौतुक केले आहे.

आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एमएस धोनीने (MS Dhoni) सीएसकेचे कर्णधारपद सोडले आणि ही जबाबदारी रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) स्वीकारली. जडेजाच्या नेतृत्वातील सीएसकेने गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ विकेट्स राखून हंगामातील दुसरा विजय मिळवला. शेवटच्या षटकात विजयासाठी सीएसकेला १७ धावांची गरज होती. यादरम्यान धोनीने शेवटच्या ४ चेंडूत १६ धावा ठोकल्या आणि विजय मिळवून दिला. दुसरीकडे, मुंबईने मात्र त्यांचा सलग सातवा सामना गमावला. धोनीने या सामन्यात १३ चेंडू खेळले आणि २८ धावा केल्या. या अप्रतिम प्रदर्शनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी दिग्गज खेळाडू आणि जाणकार धोनीचे कौतुक करत आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिग्गजांनी केले धोनीचे कौतुक
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आरपी सिंगने धोनीने विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करावे, असे मत व्यक्त केले आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “विनंती आहे की, धोनीने टी२० विश्वचषकासाठी निवृत्तीतून माघार घ्यावी.”

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने लिहिले की, “एमएस धोनी… ओम फिनिशाय नम: काय भारी सामना जिंकवून दिला.”

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रीम स्वान म्हणाला की, “धोनी महान फिनिशर आहे. त्याला कधीच विसरता येणार नाही. त्याने मुंबईच्या अपेक्षा मोडल्या आहेत.”

पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपूट सलमान बटनेही धोनीच्या खेळीचे कौतुक केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केली.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक केविन पीटरसननेही धोनीच्या अप्रतिम फलंदाजीचे कौतुक केले.

https://twitter.com/KP24/status/1517200666946523136?s=20&t=16scIWkzreVQw9YEwwbU0g

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकल वॉन नेहमी सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आता धोनीचे कौतुक करताना देखील ते मागे राहिलेले नाहीत. वॉन म्हणाले की, “तो सर्वोत्तम फिनिशर आहे आणि नेहमीच राहील.”

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेला विजय शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला. विजय मिळवण्यासाठी सीएसकेच्या ७ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘धोनी है तो मुमकिन है!’ क्रिकेट जगतात अनोखी मुद्रा उमटवलेला ‘मिस्‍टर फिनिशर’, उथप्पानेही गायले गोडवे

‘दोघे नेट्समध्ये चांगले खेळतायत’; रोहित-इशानचा गोलंदाजांपुढे उठतोय बाजार, तरीही प्रशिक्षकांकडून पाठराखण

‘तूने तो बराबर बिठाके रखा था एक आदमी’; जडेजा-सूर्यकुमारमधील मैत्रीपूर्ण संवादाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---