इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (आयपीएल २०२२) बिगुल वाजले असून लवकरच या हंगामाचा मेगा लिलावही पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याच्या अंती अर्थात ३० नोव्हेंबर रोजी आयपीएलच्या या १५ व्या हंगामाची रिटेंशन प्रक्रिया पार पडली आहे. यासह आजवर आयपीएलचे एकही जेतेपद न पटकावू शकलेल्या पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कर्णधार केएल राहुल याने स्वतला संघात रिटेन करण्यासाठी नकार दिला आहे. यानंतर आता अजून एका सदस्याने पंजाब संघाची साथ सोडली असल्याचे वृत्त पुढे आले आहे.
झिम्बाब्वेचे माजी कर्णधार राहिलेले एँडी फ्लॉवर यांनी पंजाब संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरुन राजीनामा दिला आहे. यानंतर आता ते आयपीएलमधील नव्या संघासोबत जोडले जाण्याची शक्यता आहे. गतवर्षीच फ्लॉवर हे पंजाब संघासोबत जोडले गेले होते. यावेळी प्रथमच ते आयपीएलमधील कोणत्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून जोडले गेले होते.
फ्लॉवर यांच्या निर्णयाविषयी माहिती देताना बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले की, “फ्लॉवर यांनी नुकताच पंजाब संघाला राजीनामा पाठवला होता. त्यांच्या राजीनाम्याचा संघानेही स्विकार केला आहे. यानंतर आता ते आयपीएलमधील नव्या फ्रँचायझी, अहमदाबाद किंवा लखनऊ यांच्यासोबत जोडले जाण्याची दाट शक्यता आहे.”
पंजाब संघाची साथ सोडल्यानंतर नव्या संघात ५३ वर्षीय फ्लॉवर यांना अजून महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळू शकते. कारण ते गेल्या २ वर्षांपासून पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंसोबत काम करत होते. तसेच वसिम जाफर या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि जॉन्टी रोड्स हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. त्यामुळे त्यांना या दिग्गजांचाही सहवास लाभला आहे.
सीपीएलमधूनही होऊ शकतात वेगळे
यानंतर आता पाहावे लागेल की, फ्लॉवर हे आयपीएलप्रमाणेच कॅरेबियन प्रीमियर लीग अर्थात सीपीएलमधील सेंट लूसिया संघाच्या प्रशिक्षकपदीही कायम राहतात की नाही? यामागचे कारण असे की, या संघाचे मालकी हक्कही पंजाब किंग्ज संघाच्या मालकांच्या हाती आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन गोलंदाज, नावं ऐकून व्हाल थक्क
राहुलला रिलीज करण्यामागचं कारण आले समोर; प्रशिक्षक कुंबळेंचा धक्कादायक खुलासा
इतकं कोण करतं ना? विराटचं कौतुक करावं तितकं कमीच, आरसीबीसाठी स्वत:च्या पगारात केली कपात