भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक चालू आयपीएल हंगामातील विराट कोहलीचे पहिले अर्धशतक चाहत्यांना शनिवारी (३० एप्रिल) पाहायला मिळाले. मागच्या हंगामानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडलेल्या विराटकडून यावर्षी चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती, पण तो तसे करू शकला नाही. गुजरात टायटन्सविरुद्ध अखेर विराटला आयपीएल २०२२मधील पहिले वैयक्तिक अर्धशतक करता आले.
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (GT vs RCB) यांच्यातील हा सामना मुंबई स्थित ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. विराट कोहली (Virat Kohli) याच्या बॅटमधून या सामन्यात एकूण ५८ धावा निघाल्या. यासाठी विराटने ५३ चेंडूंचा सामना केला आणि ६ चौकारांसह एक षटकार देखील ठोकला. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी विराटने ४५ चेंडू घेतले. विराटच्या या खेळीमुळे त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) खूपच आनंदात दिसली.
https://twitter.com/SlipDiving/status/1520357947183751168?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1520357947183751168%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.crictracker.com%2Fthis-is-how-netiznes-reacted-when-virat-played-a-good-knock-against-gujrat-titans%2F
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मोठ्या काळानंतर विराटने अर्धशतक केल्यामुळे स्टेडियममध्ये आनंदाचे वातावरण बनले. विराटने ५० धावांचा टप्पा पार करताच स्टेडियममध्ये जल्लोष सुरू झाला. स्टॅन्डमध्ये बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला. अनुष्का आनंदाने ओरडताना आणि विराटसाठी टाळ्या वाजवताना देखील दिसली. मागच्या १४ आयपीएल सामन्यात विराटचे हे पहिले अर्धशतक आहे. यादरम्यान विराटने १३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा विरोधी संघातील खेळाडू देखील त्याचा हात हातात घेऊन अभिनंदन करताना दिसले.
Anushka is here !! 💚
50 for Virat Kohli 🥳
Happy Birthday in Advance Anushka🤩🤍 pic.twitter.com/R7TIPWpBRp— anayaaa🍭 (@anayahahah) April 30, 2022
गुजरात टायटन्सविरुद्ध खेळपट्टीवर विराट ज्या पद्धतीचे प्रदर्शन करत होता, ते पाहून चाहत्यांची मने सुखावली आहेत. विराट त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये पुन्हा परतल्याचे दिसत होते. अशात तो वैयक्तिक शतक करेल, अशी अनेकांची अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. मोहम्मद शमीने टाकलेल्या १७व्या षटकातील चौथा चेंडू अचूक यॉर्कर होता, जो थेट स्टंप्समध्ये घुसला आणि विराटला मैदान सोडावे लागले.
विराटव्यतिरिक्त तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला रजत पाटीदारने देखील अप्रतिम प्रदर्शन करत अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या २९ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. पाटीदारने एकूण ३२ चेंडू खेळले आणि यामध्ये ५२ धावा साकारल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिस शून्य धावांवर बाद झाला, तर अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने ३३ धावांचे योगदान दिले. या प्रदर्शनाच्या जोरावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा उभ्या केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार अंतिम सामना
रोहित शर्मा – एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार
कृणाल पंड्याची मागील ७ महिन्यांतील मेहनत आली फळाला, दमदार गोलंदाजीचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला