ऑस्ट्रेलिया संघाचा महत्वाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणारा ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये योगदान देऊ शकतो. मॅक्सवेल मैदानात वेगाने धावा करू शकतो, तसेच वेळप्रसंगी संघासाठी उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीही करू शकतो. असे असले तरी, क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो एक फिरकी गोलंदाज नव्हता, तर मध्यमगती वेगवान गोलंदाज होता.
आरसीबी पॉडकास्टवर बोलताना ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने मध्यम गती वेगवान गोलंदाज, ते एक ऑफ स्पिनरपर्यंतचा त्याचा प्रवास सांगितला आहे. तो म्हणाला, “मी विक्टोरियाच्या १९ वर्षाखालील संघासोबत खेळत होता. जेव्हा मला निवडले गेले, तेव्हा मी मध्यम गती गोलंदाज होतो, ऑफ स्पिनर नाही. मला माझी वेगवान गोलंदाजी आवडायची. मी डेविड सेकरसोबत काम केले होते.” त्यावेळी सेकरने मॅक्सवेलला सल्ला दिला की, “मला नाही वाटत की, वेगवान गोलंदाजी तुझ्यासाठी बनली आहे.”
सेकरच्या सल्ल्यानंतरही मॅक्सवेलने फिरकी गोलंदाज बनण्याचा कसलाही विचार केला नव्हता, पण मिळालेल्या संधीने त्याच्यात हा बदल घडवून आणला. मॅक्सवेलने पुढे सांगितले की, “मी ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यासाठी काही सोपे बदल केले. विक्टोरिया संघ एका अशा फलंदाजाच्या शोधात होता, जो एक ऑफ स्पिनरही असावा. १९ वर्षांच्या वयात वेगवान गोलंदाजी सोडणे, एक सोपा निर्णय होता आणि त्यानंतर ऑफ स्पिनसह पुढे गेलो. ”
“नशिबाने खूप चांगल्या फिरकी गोलंदाजीच्या प्रशिक्षकांसोबत काम करायला मिळाले. त्यांनीच एका मध्यम गती वेगवान गोलंदाजाची ऍक्शन बदलली आणि एक अशा व्यक्तिला ऑफ स्पिन गोलंदाज बनवले, ज्याच्यावर ऑफ स्पिन गोलंदजीसाठी विश्वास दाखवला जाऊ शकत होता.”
दरम्यान, मॅक्सवेलने फिरकी गोलंदाजाच्या रूपात चांगले यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीयमध्ये त्याने ५१, तर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३४ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएमध्ये त्याला २० विकेट्स मिळाल्या आहेत. आरसीबीने आगामी आयपीएल हंगामासाठी विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल या तीन विश्वासू खेळाडूंना संघात रिटेन केले होते.
महत्वाच्या बातम्या –
धोनी आणि ‘जर्सी नंबर- ७’, काय आहे रहस्य? वाचा सविस्तर
‘असं असतं भावा’, रिषभ पंतने ‘खाबी’ बनत उडवली अक्षर पटेलची खिल्ली, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट