मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुरुवारी (३१ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात आयपीएल २०२२ चा सातवा सामना झाला. या रोमांचक सामन्यात लखनऊने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यादरम्यान लखनऊचा युवा धडाकेबाज फलंदाज आयुष बदोनी याने १९ व्या षटकात असे काही केले, ज्यामुळे सर्वांचा थरकाप उडाला. बदोनीने या षटकात जोरदार षटकार मारला, ज्यामुळे एक महिला दर्शक गंभीर जखमी होऊ शकली असती.
त्याचे झाले असे की, चेन्नई संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २१० धावा केल्या होत्या. चेन्नईच्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बदोनी (Ayush Badoni) १८व्या षटकात फलंदाजीला आला होता. अखेरच्या काही षटकांमध्ये संघाला सामना जिंकून देण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. त्यानेही एविन लुईससोबत मिळून आक्रमक पवित्रा घेत अंतिम षटकात धुव्वादार फटकेबाजी केली.
दरम्यान चेन्नईकडून शिवम दुबे १९वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर बदोनीने जोरदार षटकार मारला (Ayush Badoni Six), जो डिप बॅकवर्ड लेगच्या वरून गेला आणि स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या महिला दर्शकाच्या डोक्यावर (Women Spectator Injured) जाऊन जोराने आदळला. चेंडू डोक्याला लागल्यानंतर ती महिला वेदनेने कळवळताना दिसली आणि डोके चोळताना दिसली. याचवेळी त्या महिलेसोबत आलेल्या दुसरी महिला तिला सांत्वना देताना दिसली.
सुदैवाने त्या महिलेला गंभीर दुखापत झाली नाही. कारण नंतर कॅमेरामनने तिच्यावर कॅमेरा फिरवला तेव्हा ती महिला सामन्याचा आनंद लुटताना दिसली. विशेष म्हणजे, बदोनीच्या षटकाराचा चेंडू लागलेली महिला ही लखनऊचे प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई संघाला पाठिंबा (CSK vs LSG) देण्यासाठी आली होती.
https://twitter.com/time__square/status/1509590551145811978?s=20&t=iuHuSEdUTqY4Ssn24rumkA
रोहितनमुळेही चाहता झाला होता जखमी
आयपीएलपूर्वी भारत आणि श्रीलंका संघांमध्ये झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा याच्या षटकारामुळे एक दर्शक जखमी झाला होता. त्याने या सामन्यादरम्यान एक जोरदार षटकार मारला होता, ज्याचा चेंडू दर्शकाच्या नाकावर जाऊन आदळला होता. त्यानंतर त्या दर्शकाला रुग्णालयात भरतीही करण्यात आले होते. त्याच्या नाकातील हाड तुटले होते आणि त्याला टाकेही पडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
लखनऊचे ‘नवाब’ ठरले चेन्नईच्या ‘किंग्स’ला भारी! ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवले चौथे स्थान
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. पंजाब सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला