आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने २०२२ हंगामात आतापर्यंत अप्रतिम प्रदर्शन केले आहे. भारतीय संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी सध्या हैदराबादच्या गोलंदाजी आक्रमणासाठी महत्वाची आहे. अशातच आता या दोघांचे काही मजेशीर पोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात दोघांनी मुलींचे रूप धारण केल्याचे दिसत आहे.
चालू हंगामातील सुरुवातीच्या आठ सामन्यांपैकी पाच सामने सनरायझर्स हैदराबादला जिंकता आले आहेत. गुणतालिकेत संघ गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत हैदराबाद बाजी मारेल, असे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांकडे प्रत्येकी १० गुण आहेत. परंतु नेट रन रेटच्या जोरावर हैदराबाद तिसऱ्या, तर लखनऊ चौथ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हैदराबादचा गोलंदाजी अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सोबतचा हा मजेदार फोटो स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये दोन फोटो आहेत, पहिल्या फोटोत वॉशिंग्टन एकटा दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत भुवनेश्वरही त्याच्यासोबत आहे. दोघांचेही चेहरे एकदम हासरे आहेत, जे चाहत्यांचा खूपच आवडले आहेत. पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका चाहत्याने या दोघांचा उल्लेख ‘सुंदरी’ आणि ‘भुवनेश्वरी’, असा केला आहे. अशाच वेगवेगळ्या आणि मजेशीर कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.
https://www.instagram.com/p/Cc5oQLoPg0w/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, चालू हंगामातील या दोघांच्या प्रदर्शनावर नजर टाकली, तर भुवनेश्वर कुमारने सुरुवातीच्या आठ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतल्या आहेत, तर दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरला चालू हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या पाच सामन्यात सुंदरने ४ विकेट्स घेतल्या आहेत, तर फलंदाजीत ६१ धावांचे योगदान दिले आहे.
चालू आयपीएल हंगामात भुवनेश्वर त्याचा जुना फॉर्म गवसल्याचे दिसत आहे. मागच्या आयपीएल हंगामात त्याने खूपच निराशाजनक प्रदर्शन केले होते. मागच्या हंगामात त्याने ११ सामने खेळले आणि यामध्ये ६ विकेट्स नावावर केल्या होत्या. असे असेल, तरीही तो हैदराबाद संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. आयपीएल २०१६मध्ये हैदराबादला विजेतेपद पटकावून देण्यासाठी त्याचे योगदान महत्वाचे होते. या हंगामात भुवनेश्वरने तब्बल २३ विकेट्स घेतल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-