येत्या २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलसाठी सर्व संघांनी चांगलीच कंबर कसली आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात आपल्याला ८ नाही, तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. यापैकी काही संघ महत्त्वाच्या बदलांसह मैदानावर उतरणार आहेत. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बेंगलोर संघाची धुरा फाफ डू प्लेसिसच्या हाती गेली आहे. त्यामुळे विराट आता कर्णधारपदाच्या दबावाखाली नसल्याचे बेंगलोरचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला वाटते. त्यामुळे तो आगामी हंगामात विरोधी संघांतील गोलंदाजांसाठी खतरनाक ठरू शकतो.
मागील वर्षी बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे कर्णधारपद सोडणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय संघाच्या टी२० आणि कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले होते. तसेच, त्याला वनडे कर्णधारपदावरूनही काढण्यात आले. आता त्याच्यावर कर्णधारपदाचा कसलाही ताण नाही.
त्यामुळे मॅक्सवेलचा (Glenn Maxwell) असा विश्वास आहे की, पूर्वीप्रमाणे आता मैदानावर विराट तोडीस तोड देणारा आक्रमक खेळाडू नाही. हे हैराण करणारे आहे. बेंगलोरच्या पॉडकास्टवर बोलताना मॅक्सवेल म्हणाला की, “त्याला माहिती आहे की, त्याने कर्णधारपदाची जबाबदारी सोडली आहे. जो माझ्या मते त्याच्यासाठी मोठे ओझे होते. कदाचित मागील काही काळापासून त्याच्यावर याचा ओझे होते आणि आता तो त्यातून मुक्त झाला आहे. कदाचित ही विरोधी संघासाठी खतरनाक बातमी आहे.”
𝗧𝗛𝗘 𝗚𝗥𝗘𝗔𝗧 𝗠𝗔𝗫𝗜 𝗦𝗛𝗢𝗪 🎥
2️⃣0️⃣2️⃣2️⃣ edition coming soon. 😎🔥
Drop a 🤩 if you can’t wait to see @Gmaxi_32 in red and gold, 12th Man Army!#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 pic.twitter.com/DQXq5CRYGw
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 16, 2022
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज मॅक्सवेलला याचा आनंद आहे की, विराट अशा टप्प्यावर आहे, जिथे तो खरोखर सामन्यांचा आनंद घेऊ शकेल.
पुढे बोलताना तो म्हणाला की, “‘त्याला थोडं मोकळं वाटणं खूप छान असेल आणि तो त्याच्या कारकिर्दीची पुढची काही वर्षे बाहेरच्या कोणत्याही दबावाशिवाय अनुभवू शकेल. मला वाटतं त्याच्याविरुद्ध खेळताना तो खूप आक्रमक स्पर्धक होता, मैदानावरच तो तुम्हाला उत्तर देत होता. तो नेहमीच खेळावर आणि प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करायचा.”
मॅक्सवेलने असेही सांगितले की, विराटसोबत क्रिकेटबद्दल चर्चा करण्यास खूप आवडते आणि तो आता त्याचा जवळचा मित्र बनला आहे.
विराटच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २०७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७.३९ च्या सरासरीने ६२८३ धावा घेतल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ४२ अर्धशतके ठोकली आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्या बंधू खेळणार वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून, हार्दिकची वहिनीने शेअर केला भावूक व्हिडिओ
काय आहे एमएस धोनीच्या ‘जर्सी नंबर- ७’चे रहस्य? खुद्द ‘माही’नेच केलाय खुलासा