भारतीय संघाचा (team india) माजी दिग्गज कर्णधार आणि कॅप्टन कूल नावाने सर्वत्र ओळखला जाणारा एमएस धोनी (ms dhoni) आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी पूर्णपणे तयार दिसत आहे. काही दिवसांपूर्वी धोनी आयपीएलच्या मेगा लिलावाची रणनिती तयार करण्यासाठी चेन्नईत दाखल झाला होता. आता सोशल मीडियावर धोनीचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो टेनिस खेळण्याच्या आनंद घेताना दिसत आहे. धोनीने मेगा लिलावासाठीची सीएककेची रणनीती तयार केली असावी त्यामुळे तो टेनिसमध्ये एवढा मग्न झाल्याचे दिसत आहे.
आयपीएलमध्ये पुढच्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. आता मैदानात आठ ऐवजी १० संघांचे एकमेकांसमोर आव्हान असेल. मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला आयोजित केला जाणार असल्याचे बीसीसीआयने यापूर्वीच जाहीर केले आहे. मंगळवारी (०१ फेब्रुवारी) बीसीसीआयने ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली, जे मेगा लिलावात प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत. एमएस धोनी जरी मेगा लिवावासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिला नाही, तरी अप्रत्यक्ष त्याचा सहभाग लिलावात असणार आहे.
https://www.instagram.com/p/CZdWuzvIs_R/?utm_source=ig_web_copy_link
मागच्या आठवड्यात धोनी चेन्नईत दाखल झाल्याचे उघड झाले होते. चेन्नईत येऊन त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या कार्यालयात मेगा लिलावाशी संबंधित चर्चा केली होती. अशी माहिती आहे की, धोनीने चेन्नईत सीएसकेच्या अधिकाऱ्यांसोबत बसून त्या खेळाडूंच्या नावाची यादी तयार केली आहे, ज्यांच्यावर मेगा लिलावात संघ बोली लावणार आहे. त्यामुळे एकप्रकारे धोनीच्या डोक्यावरचे ओझे कमी झाले आहे आणि आता तो टेनिसचा आनंद घेत आहे. मेगा लिलावाशी संबंधित सर्व तयारी करून धोनी आता त्याच्या घरी रांचीमध्ये परतला आहे. रांचीत तो पुढचे काही दिवस विश्रांती करेल.
दरम्यान, चैन्नई सपुर किंग्जने आयपीएल २०२० हंगामात खूप निराशाजनक प्रदर्शन केले होते. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वात २०२१ ने संघाने जबरदस्त प्रदर्शन केले आणि आयपीएल ट्रॉफी नावावर केली. धोनीने ज्याप्रकारे पुनरागमन केले त्यासाठी त्याचे सर्वांनीच कौतुक केले. सीएसकेनेही धोनीला पुढच्या हंगामासाठी संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीव्यतिरिक्त सीएसकेने पुढच्या आयपीएल हंगामासाठी रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांना रिटेन केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावात नाव येताच ‘या’ फलंदाजाने पाडला धावांचा पाऊस; फ्रॅंचाईजींचे वेधले लक्ष
‘किंग कोहली’चा १०० वा कसोटी सामना असेल खास! जाणून घ्या नेमक कारण
कॅप्टन जोमात! उपांत्य सामन्यापूर्वी यश धूलने दाबली ऑस्ट्रेलियाची दुखरी नस; म्हणाला…