आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर झाली. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचा आमना-सामना झाला. या सामन्यात रवींद्र जडेजाने पहिल्यांदाच सीएसकेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. एमएस धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर फलंदाजाच्या रूपात उत्कृष्ट प्रदर्शन केले. धोनीने या सामन्यात सीएसकेसाठी सर्वाधिक धावा केल्या.
धोनीने वय सध्या ४० वर्ष आणि २६२ दिवस आहे. या वयात धोनीने आयपीएलमध्ये अर्धशतक केले. तो आता आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू बनला आहे. धोनीने या सामन्यात ३८ चेंडू खेळले आणि ५० धावा केल्या. यादरम्यान धोनीने सर्वाधिक ७ चौकार मारले. धोनीने मारलेल्या चौकारांमध्ये एक हेलिकॅप्टर शॉटही होता. धोनीव्यतिरिक्त सीएसकेचा एकही खेळाडू अर्धशतकी खेळी करू शकला नाही. कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने २६, तर रॉबिन उथप्पाने २८ धावांचे योगदान दिले.
वयाच्या ४० व्या वर्षी धोनी या सामन्यात सीएसकेसाठी सर्वाधिक चौकार मारणार फलंदाज ठरला. धोनीने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली असली तरी, सीएसकेचे इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले. ऋतुराज गायकवाडने मागच्या आयपीएल हंगामात सीएसकेसाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते. पण या हंगामातील पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला. ऋतुराज एकही धाव न करता बाद झाला, तर दुसरा सलामीवीर डिवॉन कॉनवे अवघ्या ३ धावा करून तंबूत परतला. तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अंबती रायडूने १५ धावा करून विकेट गमावली.
सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) या दोन्ही संघांना या हंगामात नवीन कर्णधार मिळाले आहेत. जडेजासाठी हा त्याचा कर्णधाराच्या रूपात पहिला आयपीएल सामना होता. तर दुसरीकडे श्रेयस अय्यरकडे मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाचा अनुभव होता. सामन्याच्या सुरुवातील श्रेयस अय्यरने केकेआरसाठी नाणेफेक जिकंली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्यम घेतला. श्रेयसने घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला आणि सीएसकेला जास्त धावा करता आल्या नाहीत. मर्यादित २० षटकांमध्ये सीएसकेने ५ विकेट्सच्या नुकसानावर १३१ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
IPL2022 | पहिल्याच सामन्यात धोनीने ‘करुन दाखवलं’, वादळी अर्धशतकी खेळीसह सीएसकेला सावरलं
आया है राजा..! ‘थाला’च्या एन्ट्रीवेळी चाहत्यांनी मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले, Video तुफान व्हायरल
केकेआरच्या युवा किपरची कला पाहून मास्टर-ब्लास्टरला आठवला धोनी; क्षणार्धात केले ट्विट