चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्रावो आयपीएलमध्ये मोठ्या काळापासून एकत्र खेळत आहेत. दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण आयपीएलमध्ये सीएसकेसाठी ते खेळतात. रविवारी (दि. ०८ मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी सीएसकेसाठी चांगले प्रदर्शन केले. खेळाडूंच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे सीएसकेने हा सामना ९१ धावांच्या अंतराने जिंकला. यादरम्यान धोनीने ब्रावोची अशी काही फिरकी घेतली, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) आणि ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) यांच्या मैदानातील गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसे पाहिले तर धोनी ब्रावोपेक्षा वयाने मोठा आहे, पण धोनीने रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ब्रावोची त्याच्या वयावरून फिरकी घेतली. हा प्रसंग दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १७व्या षटकात पाहायला मिळाला. एन्रीच नॉर्कियाने महीश तीक्षणाच्या चेंडूला कव्हर्सच्या दिशेने मारले. त्यावेळी ब्रावो ३० यार्ड सर्कलच्या आतमध्ये उभा होता, पण त्याने चपळाई दाखवली आणि फलंदाजाला एकही धाव घेऊ दिली नाही. गोलंदाजीमध्ये त्याने २४ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ब्रावोने केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणानंतर धोनी त्याच्या कौतुकात म्हणाला की, “वेल डन ओल्ड मॅन.” धोनीच्या या विधानानंतर समालोचक देखील हसू आवरू शकले नाहीत. तसे पाहिले, तर धोनी सध्या ४० वर्षांचा आहे, तर ब्रावोचे वय ३८ वर्षे आहे. अशात त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या ब्रावोला धोनीने ‘ओल्ड मॅन’ म्हटल्यामुळे सर्वांनाच हसू आले. ब्रावो आणि धोनी आयपीएल २०११ पासून एकत्र सीएसकेचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.
https://twitter.com/SlipDiving/status/1523356838892568576?s=20&t=3jp0H9R_0onuYee5i23w3w
धोनीचे वय जरी जास्त झाले असले, तर त्याने चालू हंगामात सिद्ध केले आहे की, वय हा त्याच्यासाठी फक्त एक आकडा आहे. हंगामात धोनीने एखाद्या युवा खेळाडूंना लाजवेल असे प्रदर्शन केले आहे. तसेच, कर्णधारपद पुन्हा हातात घेतल्यापासून सीएसकेला दोन विजय देखील मिळवून दिले आहेत. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात धोनीने शेवटच्या षटकांमध्ये अवघ्या ८ चेंडूत नाबाद २१ धावा ठोकल्या आणि संघाची धावसंख्या २०० पार घेऊन गेला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शार्दुल ठाकूरला शिवम दुबेने दाखवला दबंग अंदाज; खडे-खडे भिरकावला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा गगनचुंबी षटकार
पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादवला मोठा फटका, तर चहलला आव्हान देणार ‘हा’ गोलंदाज
‘टी२०त १५७च्या वेगाला काही किंमत नसते’, उमरान मलिकवर शास्त्रींचा जोरदार निशाणा