---Advertisement---

‘भाई ३डी चष्मा घातलेला का?’, लिविंगस्टोनचा सोपा झेल सोडलेला अंबाती रायुडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Ambati-Rayudu
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील ११ व्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सने ५४ धावांनी पराभूत केले. पंजाबचा हा दुसरा विजय होता. या सामन्यात पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने ३२ चेंडूत ६० धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. लिविंगस्टोनच्या या खेळीदरम्यान क्षेत्ररक्षक अंबाती रायुडूने त्याचा एक झेल सोडला. त्याचा अशा खेळीनंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

पंजाबच्या ७ व्या षटकात कर्णधार रविंद्र जडेजाच्या चेंडूवर अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) लिविंगस्टोनचा सहज आणि सोपा झेल सोडला. रायुडू शाॅर्ट थर्ड-मॅनवर उभा होता आणि हा सोपा झेल सोडल्यानंतर अंबाती रायुडू नाराज झाल्याचा दिसला. नंतर जडेजाच्याच चेंडूवर लियाम लिविंगस्टोनचा झेल अंबाती रायुडूने घेतला. परंतु, तोपर्यंत त्याने ६० धावा केल्या होत्या. या कारणामुळे चाहते रायुडूवर चांगलेच भटकलेले दिसले, त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

चाहत्यांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर केले आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘भाई ३ डी चष्मा घातला आहे काय?’ अजून एका चाहत्याने लिहले की, ‘काय करु याचे.’ अनेक चाहत्यांनी त्याच्यावर राग काढत लिहले आहे की, ‘भाई काय करत आहेस तू?’

https://twitter.com/VijayKu25181080/status/1510629942270181381?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510629942270181381%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2022-ambati-rayudu-trolled-after-he-dropped-esy-catch-of-liam-livingstone-96999

https://twitter.com/_Mr__360_/status/1510629247232188421?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510629247232188421%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2022-ambati-rayudu-trolled-after-he-dropped-esy-catch-of-liam-livingstone-96999

https://twitter.com/SauravS_Rajput/status/1510630905915736067?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510630905915736067%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2022-ambati-rayudu-trolled-after-he-dropped-esy-catch-of-liam-livingstone-96999

https://twitter.com/1no_aalsi_/status/1510629048904724480?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510629048904724480%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2022-ambati-rayudu-trolled-after-he-dropped-esy-catch-of-liam-livingstone-96999

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1510634595254878212

https://twitter.com/MaharjanSamraat/status/1510634770933649414

या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ विकेट्स गमावत १८० धावा केल्या. सर्वाधिक धावा करताना लिविंगस्टोनने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या, तसेच शिखर धवनने ३३ तर जीतेश शर्माने २६ धावा केल्या. सीएकेकडून जाॅडर्नने २ आणि प्रेटोरियसने २ विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसके संघ १८ षटकांत १२६ धावा करुन सर्वबाद झाला. संघात शिवम दूबेने ३० चेंडूत ५७ धावा केल्या, यामध्ये तीन षटकारांचा आणि सहा चौकारांचा समावेश आहे. तसेच धोनीने २३ धावांची खेळी खेळली. पंजाबकडून राहुल चाहरने ३ विकेट्स घेतल्या तर लिविंगस्टोन आणि अरोराने पत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

पंजाब संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे तर सीएसके संघ नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर राजस्थान राॅयल्स संघ आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीच्या प्राणामिकपणाने जिंकले हृदय! स्वत:हून पंचांना म्हणाला, आधी रिप्ले पाहा, मग निर्णय द्या

चेन्नईविरुद्धच्या विजयाचा पंजाबकडून जोरदार जल्लोष; ड्रेंसिंगरुममध्ये खेळाडूंच्या नाच-गाण्याचा Video व्हायरल

केशव महाराजने बांगलादेशच्या फलंदाजांची उडवली दाणादाण, दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या कसोटीत २२० धावांनी विजय

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---