रविवारी (२९ मे) इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर त्यांची सर्वात मोठी ताकत आहे, पण रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल ही फिरकी गोलंदाजांची जोडीही त्यांच्यासाठी महत्वाची कामगिरी करत आली आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा एक फलंदाज मात्र या फिरकी गोलंदाजांचा फायदा घेऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकी दिग्गज फलंदाज डेविड मिलर (David miller) आयपीएलच्या या हंगामात नवीन फ्रँचायझी गुजरात टाययटन्समध्ये सहभागी झाला. मिलरने चालू हंगामातील १५ सामन्यांमध्ये ६४.१४ च्या सरासरीने आणि १४१.१९च्या स्ट्राईक रेटसह ४४९ धावा केल्या आहेत. फिरकी गोलंदाजांसाठी मिलर अधिकच घातक फलंदाज ठरला आहे. त्याने या हंगामात फिरकी गोलंदाजांविरोधात ९६च्या सरासरीने आणि १४४.३६च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. चालू हंगामात फिरकी गोलंदाजांविरुद्ध कमीत कमी १३० चेंडू खेळणाऱ्यांमध्ये मिलर सर्वोत्तम स्ट्राईक रेटच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर, तर सरासरीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मिलरचे फिरकी गोलंदाजांविरुधातील आकडे पाहून राजस्थान रॉयल्सची चिंता मात्र नक्कीच वाढली असेल. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हे राजस्थानचे दोन महत्वाचे गोलंदाज आहे, पण मिलर या फिरकी गोलंदाजांच्या जोडीची अंतिम सामन्यात चांगलीच धुलाई करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याच कारणास्तव राजस्थानला अंतिम सामन्यासाठी मिलरच्या विरोधात काहीतरी ठोस रणनीती आखावी लागणार आहे आणि अंमलात देखील आणावी लागणार आहे.
अश्विनने चालू आयपीएल हंगामात खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत, तर चहलने १६ सामन्यांमध्ये २६ विकेट्स घेतल्या आहेत. चहल आयपीएल हंगामात चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आरसीबीचा वानिंदू हसरंगा आहे, पण त्याचा संघ आता स्पर्धेतून बाहेर गेला आहे आणि चहलकडे अंतिम सामन्यात पर्पल कॅप जिंकण्याची संधी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बॅट बॅगमध्ये पॅक कर आणि कुटुंबासोबत वेळ घालव’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाचा विराटला सल्ला
‘मला कधीच वाटले नव्हते…’, फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याबाबत काय म्हणाला गुजरातचा मॅचविनर खेळाडू?
दोघेही लईच भारी खेळले! राजस्थानच्या ‘त्या’ २ गोलंदाजांचे मास्टर ब्लास्टर सचिनकडून तोंडभरून कौतुक