---Advertisement---

आता हेच बाकी होतं! वॉर्नरने लाईव्ह सामन्यातच ‘श्रीवल्ली’ गाण्यावर लावले ठुमके, पाहून तुमचेही थिरकतील पाय

On: मंगळवार, एप्रिल 12, 2022 7:13 AM
David-Warner
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात शनिवारी (दि. १० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा १९वा सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर पाकिस्ताविरुद्धची मालिका उरकून या स्पर्धेसाठी परतला होता. वार्नरने या सामन्यात पुन्हा एकदा त्याचा ‘पुष्पा’ अवतार दाखवला आहे.

दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa) काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्ज मोठ्या प्रमाणात गाजले. अनेक क्रिकेटपटूंनी त्यावर व्हिडिओ आणि इंस्टाग्राम रील्स बनवल्या, ज्या चाहत्यांमध्ये खूप व्हायरल देखील झाल्या. डेविड वॉर्नर (David Warner) पुष्पा चित्रपटावर आधारीत व्हिडिओ बनवणाऱ्यांमध्ये आघाडीवर होता आणि त्याच्या डोक्यातून हा चित्रपट अजूनही गेलेला नाहीय. शनिवारी केकेआविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानात चाहत्यांच्या मागणीमुळे वॉर्नरने पुन्हा एकदा ‘पुष्पा’ चित्रपटातील रूप धारण केले.

वॉर्नरने स्वतः त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून मैदानात पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना वॉर्नरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हाला काय वाटते? खूप चाहत्यांची मागणी होती…” वॉर्नरने शेअर केकेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. सामन्यादरम्यान एकदा नाही, तर अनेक वेळा वॉर्नर या गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसला. चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CcNa_PPlWBI/

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर केकेआरविरुद्ध वॉर्नने हंगामातील त्याचे पहिले अर्धशतक ठोकले. त्याने खेळलेल्या ४५ चेंडूत ६१ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. सलामीवीर पृथ्वी शॉ देखील ५१ धावा करून बराच वेळ वॉर्नरच्या साथीला खेळपट्टीवर उपस्थित होता. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ९३ धावांची भागीदारी केली. मोठी खेळी करून बाद झाल्यानंतर देखील वॉर्नर खूपच निराश दिसला.

एकंदरीत विचार केला, तर केकेएआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरचा संपूर्ण संघ १९.४ षटकात १७१ धावा करून बाद झाला. दिल्लीसाठी कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि सामनावीर ठरला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

व्याजासकट परतफेड! उमरानने १४०kph वेगाचा चेंडू मारला, चिडलेल्या हार्दिकनेही दिले भारी प्रत्युत्तर

अरेरे! हार्दिकने मोडला स्वत:चाच विक्रम, हैदराबादविरुद्ध ‘कासवा’सारखा खेळत नकोसा विक्रम नावावर

हैदराबादने रोखला गुजरातचा विजयरथ, ८ विकेट्सने जिंकली लढत; विलियम्सनची ‘कर्णधार’ खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---