दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने गुरुवारी (५ मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर जबरदस्त फलंदाजी केली आणि दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २१ धावांनी विजय मिळवला. विजयात डेविड वॉर्नरचे योगदान महत्वाचे असल्यामुळे त्याला सामनावीर निवडले गेले. या प्रदर्शनाच्या जोरावर वॉर्नरने खास आयपीएलच्या एका खास यादीत एमएम धोनीला मागे टाकले आहेत, तर रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
आयपीएलच्या इतिहासातील डेविड वॉर्नर (David Warner) एक दिग्गज फलंदाज आहे. त्याने या सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १८ वा सामनावीर पुरस्कार जिंकला आणि एमएस धोनी (MS Dhoni) त्याच्यापेक्षा मागे पडला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर ठरलेल्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्स पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने हा पुरस्कार २५ वेळा जिंकला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल आहे, ज्याने आयपीएलमध्ये २२ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वॉर्नर आता या यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही सामनावीराचा मान १८ वेळा पटकावला आहे. एमएस धोनी आयपीएलमध्ये आतापर्यंत १७ वेळा सामनावीर ठरला आहे आणि वॉर्नरने आता त्याला याबाबतीत पछाडले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने या लीगमध्ये आतापर्यंत १३ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.
दरम्यान, दिल्ली आणि हैदराबात यांच्यात गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्याचा विचार केला, तर वॉर्नरने त्याच्या जुन्या फ्रँचायझीला स्वतःचे महत्व दाखवून दिले. मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापनाने वॉर्नरकडून संघाचे कर्णधारपद कढून घेतले, तसेच काही सामन्यातून बाहेर देखील बसवले होते. गुरुवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर अखेर त्याला मिळालेल्या या चुकीच्या वागणुकीचा एकप्रकारे बदला घेतला.
त्याने ५८ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या आणि दिल्ली संघाला २०७ धावांपर्यंत घेऊन गेला. रोवमन पॉवलने त्याची चांगली साथ दिली. पॉवेलने अवघ्या ३५ चेंडूत नाबाद ६७ धावा ठोकल्या. २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबद संघ १८६ धावांपर्यंत पोहचला आणि २१ धावंनी पराभव स्वीकारला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अगस्त्य पांड्या आणि रशिद खानची जमली गट्टी, हार्दिकच्या पोराला खेळवतानाचा क्यूट Video व्हायरल
राज्य व्हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरास शानदार प्रारंभ
विराटला दक्षिण अफ्रिका, आयर्लंडविरुद्ध मिळणार विश्रांती? नक्की काय असेल पुढील योजना, वाचा सविस्तर